घरमनोरंजन'टीडीएम' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

‘टीडीएम’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, आगळावेगळा विषय हाताळणाऱ्या ‘टीडीएम’ची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण येत्या २८ एप्रिल २०२३ ला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मात्र चित्रपटाच्या पोस्टरने ही उत्सुकता काही कमी होऊ दिलेली नाही. पुन्हा एकदा चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा पोस्टर समोर आला असून चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले. आणि लवकरच याचा उलगडाही होणार आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारे भाऊराव कऱ्हाडे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाच्या यशानंतर कॉमेडी जॉनर घेऊन आले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मिती अशी दुहेरी धुरा त्यांनी पेलवली आहे. ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित ‘टीडीएम’ हा दर्जेदार विषय २८ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

वास्तविकतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाचा मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र जास्त विलंब न करता काही दिवसातच याचाही उलगडा होणार आहे. चित्रपटाची कथा इमोशनल वा प्रॅक्टिकल नेमकी कुठे वळण घेणार यातही अद्याप दुमत आहे, त्यामुळे चित्रपटात विशेष असे काय असणार याचा अंदाज लागत नाही आहे. या चित्रपटाच्या डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी UFO Movies सांभाळत आहे.

- Advertisement -

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. चित्रपटाचा पोस्टर पाहून रसिक प्रेक्षकांना २८ एप्रिल २०२३ ची उत्सुकता लागून राहिली असेल, यांत शंकाच नाही. तर लवकरच हा सिनेमा मोठया पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.


हेही वाचा :

तुनिषा आत्महत्येप्रकरणी शीजानच्या कुटुंबीयांचा होणार तपास?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -