घरमहाराष्ट्रनाराजी नाट्यानंतरही मराठवाड्यात मविआने गड राखला, भाजपाला 'अपक्ष'कडूनही धोबीपछाड

नाराजी नाट्यानंतरही मराठवाड्यात मविआने गड राखला, भाजपाला ‘अपक्ष’कडूनही धोबीपछाड

Subscribe

MVA win in Marathwada teacher constitution election | भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत झाली. अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. विक्रम काळे यांच्याविषयी नाराजी असूनही मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा हा गड राखला आहे.

विविध राजकीय पक्ष, संघटना आणि अपक्ष उमेदवारांमुळे बहुरंगी ठरलेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास कमावला आहे. सलग चार वेळा निवडून येत त्यांनी भाजपाला धूळ चारली आहे.

हेही वाचा – कोकणात शेकापचा बालेकिल्ला ढासळला, भाजपाचं कमळ फुललं; बाळाराम पाटील यांचा पराभव

- Advertisement -

विक्रम काळे गेल्या तीन टर्मपासून येथे शिक्षक आमदार आहेत. मात्र, शिक्षक मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यातच, या मतदारसंघातून १४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. परंतु, भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत झाली. अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. विक्रम काळे यांच्याविषयी नाराजी असूनही मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा हा गड राखला आहे.

भाजपापेक्षा अपक्ष उमेदवाराला अधिक मते

- Advertisement -

सुरुवातीच्या कलांनुसार अपक्ष उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव आघाडीवर होते. तर, महाविकास आघाडी आणि भाजपाचे अनुक्रमे क्रमांक लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, शेवटच्या कलांनुसार विक्रम काळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. विक्रम काळे यांना २० हजार ७८ मतदारांनी कौल दिला. तर, भाजपाचे किरळ काळे यांना १३ हजार ४८९ मतांवर समाधान मानावं लागलं. धक्कादायक म्हणजे, सूर्यकांत संग्राम विश्वासराव या अपक्ष उमेदवाराला १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत. म्हणजेच, भाजपाने इतका जोर लावल्यानंतरही येथील अपक्ष उमेदवाराला अधिक मते मिळाली आहेत.

कोकणात शेकापचा बालेकिल्ला ढासळला

गोव्याच्या सीमेपासून (सिंधुदूर्ग) थेट गुजरातच्या सीमेपर्यंत (पालघर) विस्तारलेल्या कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या शेकापला मोठा धक्का बसलाय. कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचा निकाल हाती लागलाय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -