घरमनोरंजन‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Subscribe

हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’येत्या 16 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमरुनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे जगभरात चाहते आहेत. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. दरम्यान, काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ची पहिल्या दिवशी करोडोंची कमाई

- Advertisement -

Avatar: The Way Of Water Box Office Advance Booking Report: Crossed 2 Crore  Mark Already, 15 More Days To Goभारतीय बॉक्स ऑफिसनुसार दिग्दर्शक जेम्स कॅमरुनच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने जवळपास 40 कोटींच्या आजपास कमाई केलेली आहे. या चित्रपटाने तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कमाई केलेली आहे. साउथच्या तुलनेत हिंदूमध्ये या चित्रपटाने कमी स्वरुपात कमाई केली आहे.

भारतातील 5 भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित

- Advertisement -

Avatar 2 Box Office Projections (Domestic): Much-Awaited Film Might Earn  Less Than Its Prequel & It's Really Shocking!हा चित्रपट भारतामध्ये हिंदी, इंग्लिश, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.

2009 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘अवतार’

Avatar: The Way Of Water: Sam Worthington Talks Trusting James Cameron,  Shooting Underwater And Jake's Character Arc | Movies | Empireदिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’ हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. आता जवळपास 13 वर्षांनी ‘अवतार’ चा दुसरा सिक्वेल ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 2009 साली या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला चांगली भुरळ पाडली होती. एका सामान्य कथेच्या आधारावर फक्त व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेऊन ‘अवतार’ चित्रपटाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल बनवण्याची घोषणा याआधीच केली होती. त्यामुळेच प्रेक्षक अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते.


हेही वाचा :

‘पठाण’ चित्रपटावर मुस्लीम समाज देखील नाराज; उलेमा बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला संताप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -