The kashmir files या चित्रपटावर आता आमिर खान म्हणतो…

प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट आर्वजून पाहायला हवा, या चित्रपटातील कथा म्हणजे भारतीय इतिहासातला महत्वाचा भाग आहे.

Aamir Khan says he was ready to quit acting ex-wife Kiran Rao daughter Ira changed his mind
आमिर खान इंडस्ट्री फिल्म सोडण्याच्या होता विचारात; पण पत्नी आणि मुलीसाठी बदलला निर्णय

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. या चित्रपटाने आता जवळपास १०० करोडचा गल्ला कमावलाय. हा बहुचर्चित चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने सुद्धा या चित्रपटाबाबत त्याचं मत व्यक्त केलंय. तो म्हणाला की, त्याने अजून ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिलेला नाही, परंतु तो लवकरच हा चित्रपट पाहणार आहे.

प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा

खरं तर दिल्लीमध्ये ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी जेव्हा आमिर खानला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट आर्वजून पाहायला हवा, या चित्रपटातील कथा म्हणजे भारतीय इतिहासातला महत्त्वाचा भाग आहे, काश्मिरी पंडितांबरोबर जे झालं ती अत्यंत दुःखद गोष्ट आहे. या अशा विषयावर तयार झालेले चित्रपट सर्वांनी पाहायला हवंत, प्रत्येक भारतीयाला कळायला हवं की, जेव्हा एखाद्यावर अशा प्रकारे अत्याचार होतो, तेव्हा त्या व्यक्तीची काय अवस्था होते.

चित्रपटाचं यश पाहून आनंद होतोय
आमिर खान पुढे म्हणाला की, या चित्रपटाने त्या सर्व लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे, जे लोक मानवतेवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच मी हा चित्रपट नक्की बघणार आहे. या चित्रपटाचं वाढतं यश पाहून मला आनंद होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
या चित्रपटाची कमाई पाहायला गेलं तर या चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांमध्ये १४१.२५ करोडोंचा टप्पा पार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच १५० करोडोंचा टप्पा पार करू शकतो. या चित्रपटातील कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचं खूप कौतुक केलं जात आहे.


हेही वाचाः सोनम कपूर होणार आई; बेबी बंप सोबतचे फोटो केले शेअर