घर मनोरंजन ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ठरणार USमध्ये सर्वाधिक कमाई करणार तिसरा तमिळ चित्रपट

‘पोन्नियिन सेल्वन 2’ ठरणार USमध्ये सर्वाधिक कमाई करणार तिसरा तमिळ चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तमिळ सुपरस्टार चियान विक्रम यांचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने देशभरामध्ये यश संपादन केलं आणि जगभरातून उत्तम कमाई केली. या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर 28 एप्रिल रोजी या चित्रपटाचा
दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. अशातच अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

‘पोन्नियिन सेल्वन 2’ठरणार तमिळ चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट

मिळालेल्या माहितीनुसार, मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’चित्रपट अमेरिकी बॉक्स ऑफिसवर तमिळ चित्रपटातील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’ने अमेरिकेत 481 ठिकाणी 1463 शोसह आगाऊ बुकिंगद्वारे 510 हजार डॉलर्स कमावले आहेत. तर, ‘पोन्नियिन सेल्वन’ने अंतिम प्रीमियरमध्ये सुमारे 459 ठिकाणी 1219 शोमधून $900,000 कमावले होते. हे अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट अमेरिकेतील तमिळ चित्रपटसृष्टीतील तिसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरणार असल्याचे मानले जात आहे. जो रजनीकांतच्या ‘कबाली’ आणि ‘पोनियिन सेल्वन’ नंतर तिसऱ्या क्रमांकावर असेल.

- Advertisement -

‘पोन्नियन सेल्वन 2′मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नंदिनी आणि मंदाकिनी अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये, नंदिनीने चोल साम्राज्याचा अंत करण्याचे व्रत घेतले आहे. या कथेतील सिंहासनाबाबत सुरू असलेले राजकारण यावेळी महायुद्ध शिगेला पोहोचेल. PS 1 मध्ये चोल शासकांची कथा दाखवण्यात आली होती. आता या भागात चोल शासकांमधील सिंहासनाचे मोठे युद्ध पाहायला मिळेल.

‘पोन्नियन सेल्वन 2′ मध्ये दिसणार हे कलाकार

‘पोन्नियन सेल्वन 2’ चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाने भारतात 250 कोटी आणि जगभरात 450 कोटींची कमाई केली होती.


- Advertisement -

हेही वाचा :

68 व्या फिल्मफेअरमध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला मिळाले ‘हे’ पुरस्कार

- Advertisment -