घरमनोरंजन'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

येत्या 4 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रत्येकाच्याच मनात प्रेमाची भावना वेग वेगळी असते. प्रेम, आपुलकी आणि उत्कटता या गोष्टी माणसाला कल्पनाशील बनवतात. प्रेम प्रत्येक माणसाच्या मनात असते. हीच प्रेमाची संकल्पना अतिशय वेगळ्या पद्धतीने “प्रेम म्हणजे काय असतं”(prem mhanje kay asat) या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून येत्या 4 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा – ‘लाल सिंग चढ्ढा’बाबत जितेंद्र आव्हाडांकडून आकड्यांचा घोळ, ट्वीट केले डिलीट

- Advertisement -

तख्त प्रॉडक्शन यांनी “प्रेम म्हणजे काय असतं” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे.कलाकारांची नावे गुलदस्त्यात असून ती लवकरच आता जाहीर होतील. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू “प्रेम म्हणजे काय असतं” या चित्रपटातून मांडला जाणार आहे.

हे ही वाचा – ड्रग्स अन् दारू घेणाऱ्यांना बघण्याची इच्छा नाही; करिना व करिष्मा कपूर नेटकऱ्यांकडून ट्रोल

- Advertisement -

“प्रेम म्हणजे काय असतं” या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेम या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट यापूर्वीही प्रदर्शित झाले आहेत. या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ”प्रेम म्हणजे काय असतं”(prem mhanje kay asat) य याचित्रटातून नेमकी गोष्ट पाहायला यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत.

हे ही वाचा – बिग बॉस फेम विशाल निकमचा नवा म्युझिक अल्बम ‘तू संग मेरे’ लवकरच भेटीला

 

Edited By – Nidhi Pednekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -