घरमनोरंजनबिग बॉस फेम विशाल निकमचा नवा म्युझिक अल्बम ‘तू संग मेरे’ लवकरच...

बिग बॉस फेम विशाल निकमचा नवा म्युझिक अल्बम ‘तू संग मेरे’ लवकरच भेटीला

Subscribe

‘तू संग मेरे’ असं म्हणत विशालने आपल्या प्रेमाची सर्वांसमोर कबुली दिली आहे. याची उत्सुकता विशाल निकमच्या चाहत्यांना सुद्धा आहे.

मराठी बिग बॉस मराठी(bigg boss marathi) हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता विशाल निकम हा खूपच जास्त प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या अभिनेता विशाल निकमच्या(vishal nikam) मनात सध्या कुणीतरी घर केलं आहे असं बोललं जात आहेत. त्याच्या मनातील ती व्यक्ती नेमकी कोण हे लवकरच त्याच्या चाहत्यांना कळणार आहे. ‘तू संग मेरे’(tu sang mere) असं म्हणत विशालने आपल्या प्रेमाची सर्वांसमोर कबुली दिली आहे. याची उत्सुकता विशाल निकमच्या चाहत्यांना सुद्धा आहे.

व्हिडीओ पॅलेसची निर्मीती असलेल्या ‘तू संग मेरे’ या हिंदी रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये अभिनेता विशाल निकम झळकणार आहे. दिशा परदेशी(disha pardeshi) ही अभिनेत्री सुद्धा विशाल सोबत या म्युझिक अल्बम मध्ये झळकणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मिस युनिव्हर्स स्पर्धेत आता विवाहित स्त्रियासुद्धा होणार सहभागी; नवीन निर्णयाची अंमलबजावणी

‘तू संग मेरे रंग भरे… कहने दे जो दिल ये कहे…
हाथ ये तेरा हाथ में… मेरे साथ ये ऐसा रहे…

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

- Advertisement -

विशाल निकमच्या या नव्या गाण्याचे हे बोल आहेत. या गीतातून त्याची दिशा सोबतची ‘प्यारवाली’ केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रोहितराज कांबळे याने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे याने स्वरबद्ध केले आहे. त्याचबरोबर काश्मीरच्या नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत झालेल्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर हिने केले आहे. तर छायांकन अमोल गोळे यांनी केले आहे.

हे ही वाचा – पंकजा मुंडे निवेदिकेच्या भूमिकेत; उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्याचे करणार निवेदन

अभिनेता विशाल निकम पहिल्यांदाच हिंदी म्युझिक अल्बम करतो आहे याच संदर्भांत विशाल निकम म्हणाला,‘या हिंदी गाण्यासाठी व्हिडीओ पॅलेसने मला दिलेली ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे’. असं विशाल म्हणाला तर याच संदर्भांत अभिनेत्री दिशा परदेशीने(disha pardeshi) सांगितले, हा वेगळा अनुभव याशूट दरम्यान मी घेतला. आमची लव्हेबल जोडी आणि हे रोमँटिक गाणं सर्वांना नक्कीच आवडेल’ अशी अशा सुद्धा दिशा परदेशी हिने व्यक्त केली.

हे ही वाचा – मुंबईच्या रस्त्यावर विराट अनुष्काची स्कूटी राईड

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -