घरमनोरंजन'फुलराणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘फुलराणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

'फुलराणी' या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले. याशिवाय चित्रपटसृष्टीवरसुद्धा याचे परिणाम दिसून आले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर ‘फुलराणी’ या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी केले असून, त्यांनी सोशल मिडियावर ‘फुलराणी’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. याशिवाय त्यांनी या चित्रपटासाठीच्या सर्व तंत्रज्ञांची नावे जाहिर केली आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि डायलॉग गुरू ठाकूर आणि विश्वास जोशी यांनी लिहिले आहे. फुलराणी ही एक अविस्मरणीय प्रेम कहाणी आहे. या फुलराणीच्या पोस्टरमध्ये एका कोपऱ्यात मोगऱ्याचा गजरा आहे. त्या बाजूला कॅप घातलेली आणि हातात सिगारेट अशी चेहरा ओळखता न येणारी व्यक्ती या चित्रपटात दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishwas Joshi (@vishwasjoshi999)

- Advertisement -

याअगोदर १४ डिसेंबरला स्वर्गीय अभिनेते सतीश दुभाषी यांच्या जयंतीनिमित्त ‘फुलराणी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. ‘मी माझे भाग्य समजतो की, स्वर्गीय सतीश दुभाषी यांना फुलराणी या नाटकात काम करताना स्वत:हा पाहू शकलो, असे कॅप्शन फुलराणीचे दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी लिहिले आहे. फुलराणी चित्रपटाचे शिवधनुष्य उचलण्याचे एकमेव कारण की सतीश दुभाषी यांना हीच खरी आदरांजली आहे, असेही विश्वास जोशी यांनी म्हटले आहे. फुलराणी या चित्रपटात नक्की काय असणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत बऱ्याच प्रेमकथा पाहिल्या, मात्र यात असे अविस्मरणीय काय असणार यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.


हेही वाचा – नांदेड पोलीस हल्ला; गुरुद्वारा हिंसाचारात १८ जणांना अटक, ४१० जणांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -