घरमनोरंजनदिल्लीकर ‘मुघल-ए-आझम’ च्या प्रेमात

दिल्लीकर ‘मुघल-ए-आझम’ च्या प्रेमात

Subscribe

बरीचशी महानाटके बंदिस्त नाट्यगृहात करणे कठीण असते. अशा प्रयोगासाठी स्टेडिअमच मिळवावा लागतो. त्याचा खर्चही आवाक्याच्या बाहेरचा असतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाटकाने त्यातल्यात्यात अधिक प्रयोग केलेले आहेत. फिरोझ अब्बास खान याने आपल्या दिग्दर्शनात ‘मुघल-ए-आझम’ या नृत्यमय महानाटकाची निर्मिती केली आहे. ज्याने पाहिले त्यांनी या महानाटकाचे कौतुक केले. भारतातल्या मुख्य शहरांत प्रयोग करताना दिल्लीकर बहुदा या नाटकाच्या प्रेमात पडलेले आहेत. एक नव्हे तर तीन प्रयोगांचे आयोजन त्यांनी काही महिन्यातच केले होते. एप्रिलमध्ये दिल्लीच्या जवाहरलाल स्टेडियममध्ये ‘मुघल-ए-आझम’चा १७५ वा प्रयोग होणार आहे.

फिरोझ अब्बास खान याच्या संकल्पनेला शहापुरजी पालनजी यांनी निर्माते या नात्याने आकार दिलेला आहे. कृष्ण-धवल चित्रपट युगात माईलस्टोन चित्रपट म्हणून ज्या चित्रपटाची जगभर लोकप्रियता मिळालेली आहे. त्यात ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटावर ही नृत्य नाट्यकृती आधारलेली आहे. अजरामर गीतांचा या महानाटकातील सहभाग हा प्रेक्षकांना मोहवून टाकणारा आहे. प्रियंका बर्वे, नेहा सरगम, निसार खान, शाहाब अली, धनवीर सिंग, अशिमा महाजन यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. बुक माय शोच्या सहकार्याने होणार्‍या या महा नृत्य नाटकाचे नृत्य दिग्दर्शन मयुरी उपाध्याय यांनी केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -