घरमनोरंजन'हाऊसफुल 5' च्या चित्रीकरणाला लवकरच होणार सुरुवात

‘हाऊसफुल 5’ च्या चित्रीकरणाला लवकरच होणार सुरुवात

Subscribe

‘हाऊसफुल’ चित्रपटाची सीरीज मागील 12 वर्षांमधील बॉलिवूडची सगळ्यात सफल ठरलेली सीरीज आहे. आत्तापर्यंत ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे 4 पार्ट प्रदर्शित झाले आहेत. आत्तापर्यंतच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले. दरम्यान, आता प्रेक्षकांचे पुन्हा मनोरंजन करण्यासाठी ‘हाऊसफुल 5’ चित्रपट सज्ज होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख देखील दिसून येऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, आता ‘हाऊसफुल 5’ च्या स्क्रिप्टवर काम सुरू करायला सुरूवात झाली आहे. साजिद नाडियावालाची हाऊसफुल सीरीज अक्षय कुमारच्या कॉमेडीसाठी देखील ओळखली जाते. बॉलिवूडमधील ‘हाऊसफुल’ सीरीज सर्वाधिक हिट आहे.

- Advertisement -

‘हाऊसफुल 5’ ची तयारी झाली सुरू

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साजिद नाडियावाला ने ‘हाऊसफुल 5’ चे काम करण्यास सुरूवात केली आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘हाऊसफुल 5’ हे असून हे सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करायला सुरूवात झाली आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख दिसून येतील असं सांगितलं जात आहे. तसेच हा चित्रपट मागील 4 चित्रपटांपेक्षा सर्वाधिक मोठा असणार आहे. चित्रपटाला पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

साजिद नाडियावाला यांनी ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची घोषणा 26 नोव्हेंबर 2019 मध्येच ‘हाऊसफुल 4’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केली होती. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण करायला सुरूवात केली आहे. 2010 मध्ये अक्षय आणि साजिद नाडियावाला ने हाऊसफुल चित्रपटाच्या सीरीजची सुरूवात केली होती. त्यानंतर 2012, 2016 आणि 2016 मध्ये हाऊसफुलचे भाग प्रदर्शित करण्यात आले. 2013 मध्ये ‘हाऊसफुल 5’ प्रदर्शित होईल.

 


हेही वाचा :

‘हर हर महादेव’ चित्रपटात अमृता खानविलकर साकारणार ‘ही’ भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -