घरताज्या घडामोडी'जयंती' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

‘जयंती’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

‘जयंती’ हा दर्जेदार मराठी चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून जयंतीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देशाच्या विकासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचे हात आहेत, आणि त्यांच्यामुळेच आज भारत देश ‘सुजलाम सुफलाम’ बनला आहे. आपल्याकडे अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात आणि सामाजिक कार्यासोबतच कालांतराने त्याभोवती राजकीय वलय आलेली दिसतात आणि नेमक्या याच विषयावर भेदक प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लॉकडाऊनच्या तब्बल १८ महिन्यांच्या कठीण कालावधीनंतर चित्रपटगृहे नव्याने सुरु होत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील ‘जयंती’ हा पहिलाच सिनेमा आहे जो सर्वप्रथम प्रदर्शित होत आहे. शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

भारतीय चित्रपटसृष्टीत प्रख्यात असलेले जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सिनेमात एका ध्येयवादी शिक्षकाची भूमिका साकारली आहे. एक चांगला शिक्षक संपूर्ण समाज सुधारू शकतो या वाक्याला पूरक ठरेल, अशी मिलिंद शिंदे यांची भूमिका आहे.

तसेच हिंदी टेलिव्हिजन जगतात ज्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळाच प्रेक्षकवर्ग तयार करून ठेवला आहे, असे अभिनेते अमर उपाध्याय हे पहिल्यांदाच मराठी सिनेमात विशेष भूमिका साकारत आहेत. या सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत. यासोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय बनला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल साँग ‘लवशीप देशील का’ हे गीतकार ‘गुरु ठाकूर’ यांनी लिहिले असून ‘सुहास सावंत’ यांनी गायले आहे. गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय, तसेच संगीत क्षेत्रातले नामांकित गायक ‘जावेद अली’ यांनी गायलेले ‘तुला काय सांगू कळेना’ या रोमँटिक गाण्याने जणू प्रेममय वातावरण निर्माण झाले आहे.

 


 

हे ही वाचा – मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीसांच्या ‘मुंबई रिव्हर अँथम’मधून हटवले जयदीप राणांचे नाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -