घरमनोरंजनकल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगणार महावितरणच्या नाट्य स्पर्धा

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगणार महावितरणच्या नाट्य स्पर्धा

Subscribe

महावितरणमधील कर्मचार्‍यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कोकण प्रादेशिक विभागाच्या कर्मचार्‍यांसाठी नाट्यगंध या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर कल्याण येथे 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी या स्पर्धा रंगणार आहेत. नाट्यरसिकांना यासाठी विनामूल्य प्रवेश आहे. या स्पर्धांचे उद्घाटन मंगळवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे असतील. यावेळी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे व कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी यांची विशेष उपस्थिती असेल अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिली आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे नाटक महावितरणच्या राज्य पातळीवर स्पर्धेत सादर होणार आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार या स्पर्धा होत आहेत. 9ऑक्टोबर रोजी भांडूप नागरी परिमंडळाच्या ’ती रात्र’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होईल. याचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी तर दिग्दर्शन डॉ.संदीप वंजारी यांनी केले आहे. दुपारी 2 वाजता नाशिक परिमंडळाचे ’झोपा आता गुपचूप’ हे नाटक सादर होईल. या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी व दिग्दर्शन रेणुका भिसे यांनी केले आहे. सायंकाळी 06.30 वाजता ’सोरगत’ हे उषा परब लिखित कोकण परिमंडळ रत्नागिरी यांचे नाटक सादर होईल.

- Advertisement -

बुधवारी 10 तारखेस सकाळी 10.00 वाजता प्रकाशगड या सांघिक कार्यालयाचे ’अशुद्ध बीजापोटी’ हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन केदार देसाई यांनी तर दिग्दर्शन विनोद गोसावी यांनी केले आहे. दुपारी 02.30 वाजता कल्याण परिमंडळाचे ’तथास्तु’ हे डॉ.संतोष बोकेफोडे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर होईल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा महावितरणचे संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन यांच्या हस्ते 10 तारखेस सायंकाळी 05.30वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक(वाणिज्य) सतीश चव्हाण असतील. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अरविंद साळवे, कार्यकारी संचालक-2 अंकुश नाळे, मुख्य विधी सल्लागार रमेश गांधी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -