घरमुंबईशिवसेना खासदार शेवाळे यांचा मेट्रो प्रशासनाला इशारा

शिवसेना खासदार शेवाळे यांचा मेट्रो प्रशासनाला इशारा

Subscribe

रहिवाशांच्या मागण्या मान्य करा,अन्यथा मानखुर्द मेट्रो कारशेडला विरोध

मुंबई: मुंबईतील मेट्रोरेलच्या जाळ्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या मानखुर्द कारशेडकरता विस्थापित होणार्‍या स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन तसेच स्थानिकांच्या रोजगार आणि इतर महत्वाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर या काराशेडचे काम होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मेट्रो प्रशासनाला दिला आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबत मेट्रो प्रशासनाला जागे करण्यासाठी काढण्यात आलेल्या धडक मोर्चामध्ये शेवाळे यांनी हा इशारा दिला.

महाराष्ट्र नगर येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी महाराष्ट्र नगर, महात्मा फुले नगर, मानखुर्द गाव, चिताकॅम्प आणि आसपासच्या परिसरातील मोठी जागा मेट्रो प्रसासनाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या अनेक रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. प्रकल्पाच्या कामामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पबाधितांना पुनर्वसनाची हमी, स्थानिक तरुणांना रोजगार आणि इतर अनेक न्याय मागण्यांसाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित काराशेडमधील मेट्रो प्रशासनाच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. स्थानिकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी खासदार शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांनी दिला.

- Advertisement -

मेट्रो कारशेडच्या कामाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प उभारताना स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींना मेट्रो प्रशासनाने विश्वासात घ्यायला हवे. जोपर्यंत स्थानिकांच्या न्याय्य मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कारशेडचे काम होऊ देणार नाही. या मोर्चानंतरही प्रशासन जागे झाले नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, याची नोंद घ्यावी.
– राहुल शेवाळे, खासदार, दक्षिण- मध्य मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -