कपिलच्या शोमध्ये जाऊन काय मिळालं?… फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारवर संतापले थिएटर मालक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होऊ लागले आहेत. 2022 मध्ये देखील अक्षयचा ‘रक्षा बंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘कठपुतली’, ‘राम सेतु’, ‘बच्चन पांडे’ हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले शिवाय आता 2023 च्या सुरुवातीलाच त्याचा ‘सेल्फी’ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळेच आता गेटी गॅलेक्सीचे मालक मनोज देसाई यांनी ‘द कपिल शर्मा’ शोवर आरोप करत अक्षय कुमारला त्यांच्या वतीने सूचक ईशारा दिला आहे.

मनोज देसाई अक्षय कुमारवर संतापले

अनेकांना ठाऊक आहे की, अक्षय कुमार आणि कपिल शर्मांची चांगली मैत्री आहे. अक्षय कुमार प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आवर्जुन ‘द कपिल शर्मा’ मध्ये जातो. सोशल मीडियावरही हे दोघे एकमेकांची अनेकदा खिल्ली उडवत असतात. मात्र, आता अक्षय कुमारच्या सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांचा दोष मनोज देसाई यांनी कपिल शर्मावर लावला आहे.

मुंबईचे प्रसिद्ध थिएटर गेटी गॅलेक्सीचे मालक मनोज देसाई आता अक्षय कुमारला द कपिल शर्मा शोमध्ये सतत हजेरी लावत असल्यामुळे सूचक ईशारा आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा पुन्हा जाऊन तुम्हाला काय मिळालं? तो त्याचा शो चालवत आहे, त्याला जनतेला मूर्ख बनवायचे आहे, जनतेला हसवायचे आहे!”

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही का सतत तिकडे जात का असता? तुमची यामध्ये काही गुंतवणूक आहे का? हा शो तर सलमान खानचा आहे, पण तुम्ही का जाता शोमध्ये? तुमचं सतत तिकडे जाणं तुम्हाला शोभत नाही.” असं मनोज देसाई म्हणाले.

 


हेही वाचा :

‘सातारचा सलमान’मधील स्वप्नांचा ध्यास घेणारे ‘तुफान’ गाणे प्रदर्शित