घरदेश-विदेशCongress : काँग्रेस पुन्हा अडचणीत; 135 कोटींनंतर प्राप्तिकर विभाग 524 कोटी वसूल...

Congress : काँग्रेस पुन्हा अडचणीत; 135 कोटींनंतर प्राप्तिकर विभाग 524 कोटी वसूल करण्याची शक्यता

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसवर आणखी एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. याआधी आयकर विभागाने काँग्रेसच्या बँक खात्यातून 135 कोटी रुपये काढले होते. यानंतर आता पुन्हा एकदा आयकर विभाग काँग्रेसकडून तब्बल 523.86 कोटी रुये वसूल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने 2014  ते 2021 दरम्यान व्यवहार केले असून पक्षाने या पैशांचा कोणताही हिशोब आयकर विभागाला दिलेला नाही. (Congress in trouble again After 135 crores income tax department is likely to recover 524 crores)

हेही वाचा – Jitendra Awhad : मविआबाबत आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना हात जोडून केली विनंती, म्हणाले…

- Advertisement -

पक्षाच्या बँक खात्यातून 135 कोटी रुपये काढण्यावर बंदी घालण्याची मागणी विरोधात काँग्रेस पक्षाने या महिन्यात प्राप्तिकर विभागाला न्यायाधिकरण (ITAT) अपील सादर केले होते. मात्र काँग्रेस पक्षाचे अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर 22 मार्च रोजी काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत प्राप्तिकर विभागाच्या कारवाईला आव्हान दिले होते. तसेच प्राप्तिकर विभागाने कारवाई उशिरा केल्याचा दावा केला होता. मात्र उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केले नाही. यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा फटका बसणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 523.87 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. के. तन्खा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, काँग्रेस पक्षाला 523.87 कोटी रुपयांवर मोठा दंड आणि व्याज जोडले जाण्याची भीती आहे. कारण यापूर्वी 135 कोटी रुपये प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या कारवाईतून आम्हाला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला निधीची कमतरता भासू शकते, असे व्ही. के. तन्खा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Ambadas Danve : ये साजिशों का दौर है और…; ठाकरे गटाच्या पहिल्या यादीनंतर अंबादास दानवे नाराज?

बँक खाती गोठवल्याप्रकरणी काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारनेच काँग्रेस पक्षाची बँक खाते गोठवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, समान पद्धतीने भाजपाबरोबर आम्हाला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून बँक खाती गोठवण्यात आली आहेत. राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी अडथळे निर्माण करून धोकादायक खेळ खेळला गेला आहे. सगळीकडे फक्त भाजपाच्याच जाहिराती आहेत आणि त्यातही त्यांची मक्तेदारी आहे. भाजपाची सर्वत्र पंचतारांकित कार्यालये आहेत. परंतु सरकारकडे त्यांच्या निवडणूक खर्चाचा हिशेब नाही. भाजपाने कधीही आपल्या बँक खात्याचा तपशील दिलेला नाही. पण आमच्याकडून त्यांना खात्याची माहिती हवी आहे, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -