घरमनोरंजन'ट्रॅजेडी किंग'ची आभाळा एवढी कारकिर्द

‘ट्रॅजेडी किंग’ची आभाळा एवढी कारकिर्द

Subscribe

हिंदी सिनेसृष्टीतील आणखी एक अजरामर तारा आज निखळला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन वयाच्या ९८ व्या वर्षी झाले. मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ७.३० वाजता दिपील कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. मोहम्मद युसूफ खान हे यांचे खरे नाव. दिसायला देखणा, उंच, गोरापान तरुण पुढे दिलीप कुमार या नावाने सिनेसृष्टीत आले. १९४४ साली ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी ‘बाबूल’, ‘दीदार’, ‘आन’, ‘गंगा जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘मुगल – ए- आझम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम; यांच्यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर भूरळ पाडली. ८०-९० च्या दशकात ‘क्रांती’, ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’, ‘किला’ या सिनेमांमधून यांच्या विविध भूमिकेत पाहता आले. पाच दशकांहून अधिक काळ दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द आभाळ एवढीच मोठी आहे. १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कार्यकाळात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. दिलीप कुमार यांना आतापर्यंत आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

पडद्यावर सामान्य माणसाची छवी साकारणारे कलाकार दिलीप कुमार यांची असंख्य गाणी रसिकांच्या स्मरणात आहे. शिवाय चित्रपटांतील त्यांचे डायलॉगही लोकप्रिय ठरले आहेत. चित्रपटांमध्ये सहज वावरणाऱ्या या कलाकाराचे खासगी आयुष्यही तितकेच चर्चेच राहिले आहे. ५० च्या दशकांतील अनेक बड्या नायिकेंसह त्यांचे नाव जोडले गेले. वैजयंती माला, मधूबाला यांच्यासोबतचे त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले. आयुष्यातील अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर त्यांनी आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री सायरा बानो हिच्याशी लग्न केले. त्यांचा हा संसार आजतागायत टिकून राहिला आहे.


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -