घरमनोरंजनपाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करणार नाही- तिग्मांशु धुलीया

पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करणार नाही- तिग्मांशु धुलीया

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेते दिग्दर्शक तिग्मांशु धुलीया यांनी आपला आगामी चित्रपट पाकिस्तान मध्ये प्रदर्शित करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरात निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते दिग्दर्शक तिग्मांशु धुलीया यांनी आपला आगामी चित्रपट ‘मिलन टॉकीज’ हा पाकिस्तान मध्ये प्रदर्शित करणार नसल्याच जाहीर केले आहे. याआधी अनेक निर्मात्यांनी पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याच जाहीर केल होत.या निर्णयामुळे आता तिग्मांशु धुलीया यांच ही नाव संबंधीत यादीत जोडले गेले आहे. दरम्यान याआधीच पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी वस्तु, यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हणाले तिग्मांशु धुलीया

आपला आगामी चित्रपट मिलन टॉकीजच्या ट्रेलर लॉंच केल्या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची माहिती दिली. यावेळी आपण पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कुटूंबीयांच्या दुखात सहभागी आहोत. तसेच पाकिस्तान मध्ये हिंदी चित्रपटांची चोरी होते. या दोन मुख्य कारणांसाठी आपण पाकिस्तान मध्ये चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याच त्यांनी सांगीतलं. यावेळी चित्रपटाचे कलाकार अली फजल, श्रद्धा श्रीनाथ, आशुतोष राणा आणि सिकंदर खेर देखील उपस्थित होते.

- Advertisement -

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय सिने कामगार संघटना (एआयसीडब्ल्यूए) ने भारतीय चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. या नंतर लुका चुप्पी आणि अर्जुन पटियालासारख्या चित्रपट पाकिस्तान मध्ये प्रदर्शित करणार नसल्याच निर्मात्यांनी जाहीर केल. यानंतर आता १५ मार्चला प्रदर्शित होणारा मिलन टॉकीज चित्रपट देखील पाकिस्तान मध्ये प्रदर्शित केला जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -