घरमहाराष्ट्रआता घ्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये उपचार!

आता घ्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये उपचार!

Subscribe

खेड्यात उपचार मिळावेत म्हणून शासनातर्फे उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना आणखी बळकटी यावी यासाठी त्यांचं रुपांतरण आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये करण्यात आलं आहे. या केंद्रांचे उद्घाटन गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळेस करण्यात आलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या या केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री विजय देशमुख हे देखील उपस्थित होते.‌

उपकेंद्रांमध्येही उपलब्ध होणार आयुर्वेदिक डॉक्टर्स

खेड्यात उपचार मिळावेत म्हणून शासनातर्फे उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. अशी महाराष्ट्रात एकूण १० हजार ६६८ उपकेंद्रे आहेत. पण, आजही तिकडे फक्त एएनएम म्हणजे आरोग्यसेविकाच उपलब्ध असून त्याच त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवतात. पण, अनेकदा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना प्राथमिक उपचार केंद्रांमध्ये किंवा जिल्हास्तरीय हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. त्यातून त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही ही खर्च होतो. पण, आता उपकेंद्रांमध्येही आयुर्वेदिक डॉक्टर्स उपलब्ध होऊन ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीलाही उपचार उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

१३ विविध प्रकारच्या मिळणार सुविधा

राज्यात प्रती उपकेंद्रांद्वारे ५ हजार आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे ३० हजार लोकांना आरोग्य सेवा दिली जाते. त्यानुसार, आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरण केलेल्या केंद्रांमध्ये एकूण १३ प्रकारच्या सेवा रुग्णांना मिळणं शक्य होणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व १० हजार‌ ६६८ उपकेंद्रांचं, ६०५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १ हजार‌ ८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचं रुपांतरण करण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून आयुर्वेद पदवीधारकाची नेमणूक केली जाणार आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर औषधी आणि तपासण्या उपलब्ध करून दिल्या जातील.

३१२ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर

राज्यात चालू वर्षात १०१२ आरोग्य उपकेंद्रांचं ,४७९ ग्रामीण भागातील आणि १२५ शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. याशिवाय गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद ,नंदूरबार या चार जिल्ह्यांसह हिंगोली, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, भंडारा, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग आणि जळगाव जिल्ह्यातील एकूण ३१२ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. सेवा देण्यार्या आरोग्य अधिकाऱ्यांना ६ महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आरोग्यवर्धिनी म्हणजेच उपकेंद्रांमध्ये जाणार आहे. हायपर टेन्शनचा त्राह वाढलेला आहे. गावातील माणसाला हे कधीच कळणार नाही त्यामुळे तो जो उपकेंद्रांमध्ये गेला तर त्याला ही सुविधा मोफत मिळणार आहे. एकुण ६८% अससंर्गजन्य आजारांचं प्रमाण आहे. त्यामुळे ही केंद्र अशा प्रकारच्या आजारांना कमी करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आज १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन एका वेळेस होत आहे. तर, एप्रिलमध्ये १२०० केंद्रांचं उद्घाटन होईल. या केंद्रांमध्ये १३ प्रकारच्या सेवा दिल्या जातील.
डॉ. अनुपकुमार यादव, आय़ुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान
- Advertisement -

हेही वाचा – अंगणवाडी, आरोग्यसेविकांवर ‘बेटी बचाओ..’ची जबाबदारी

अससंर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत आहे. यावरील उपचारही महाग आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी २५ हजार रुपये खर्च होतो. सुविधा असूनही फक्त १५ टक्के लोकच फायदा घेतात. बाकीचे अनेकदा खाजगी रुग्णालयांमध्ये जातात. त्यामुळे ही आरोग्यवर्धिनी केंद्रे असणार आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. टेलिमेडिसीनने ही जोडल्या जाणार.९३% टकके रुबेलाचं लसीकरण झालं आहे.
– प्रदीपकुमार व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग

हेही वाचा –  कौलाणे गर्भपात प्रकरण : आरोग्य विभागाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात

आज १५१ केंद्रांचं रुपांतरण करण्यात आले आहे. १२००० केंद्रांचं अपग्रेडेशन होणार आहे. डॉक्टरांची भरती प्रक्रिया ही सुरू झाली आहे. त्यामुळे ही आरोग्यवर्धिनी केंद्रे नक्कीच दिलासादायक ठरणार आहे. कमी खर्चात उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. ठाण्यात आपला दवाखाना सुरू झाला आहे. अशा अनेक सुविधा देण्याचा येत्या काळात दिल्या जातील. 
एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

हेही वाचा – एलएलआयएन रसायनी प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचा

आयुष्यमान भारत योजनेद्वारे या उपकेंद्रांमुळे आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. यात शंकाच आहे. काही अडचणी येतात का हे पाहण्यासाठी महिन्यातून एकदा बैठक घेतली जाईल. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. 
– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -