रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आगामी सर्कस चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. येत्या काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

सर्कसचा प्रदर्शित झाला ट्रेलर

या ट्रेलरची सुरुवात 60 च्या दशकापासून होते. ज्यामध्ये रणवीर सिंह एक ‘इलेक्ट्रिक मॅन’ आहे म्हणजेच ज्याच्यामधून एक करंट जात असतो. या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत वरुण शर्मा दखील महत्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची ओळख करताना दिसत आहे. तसच रणवीर सिंह आणि वरुण शर्मा हे दोघेही डबल रोल मध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे खूप चित्रपटात खूप गोंधळ झालेला देखील दिसेल.

दरम्यान, या ट्रेलरच्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये तुम्हाला अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील दिसेल. यामध्ये दीपिका रणवीरसोबत एका गाण्यावर डान्स करताना दिसेल,.

23 डिसेंबर 2022 रोजी होणार चित्रपट प्रदर्शित
सर्कस या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रोहित शेट्टीने केली असून यामध्ये रणवीर सिंह, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीवर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.23 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी केलंय डेस्टिनेशन वेडिंग