घरमनोरंजनआमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'चे ठग्ज आहेत तरी कोण?

आमिर खानच्या ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चे ठग्ज आहेत तरी कोण?

Subscribe

अभिनेता अमिर खान 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट यावर्षीच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ठग्ज नक्की कोण आहेत?

अभिनेता अमिर खान ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट यावर्षीच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट ब्रिटनचा लेखक फिलिप मेडोज टेलर यांनी लिहिलेल्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग’ या पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक १८३९ मध्ये प्रसिद्ध झाले होते. १९व्या शतकात ते सर्वात जास्त विकले गेलेले पुस्तक ठरले होते. या पुस्तकाच्या कथेतील मुख्य नायक असलेला सईद अमीर अलीच्या आई-वडिलांची ठगांकडून लूट आणि त्यांची हत्या केली जाते. त्यानंतर इस्माइल नावाचा ठग त्याचे पालनपोषण करतो आणि अमीर अली खूप भयानक आणि खतरनाक ठग बनतो.

आदिवासी ठगांनी इंग्रजांना केला होता विरोध

या चित्रपटाच्या नावावरुन देशभरात बऱ्याच चर्चाना उधान आले आहे. ‘ठग्ज’ नाव घेताच लोकांच्या मनात गुंड, दरोडेखोर, लुटारुंचे चेहरे डोळ्यांसमोर उभे राहतात. मात्र खरं काही वेगळं आहे. भारतात ‘ठग’ हे एका आदिवासी जमातीचे नाव होते. ते जंगलामध्ये राहत आणि कालिका मातेची पूजा करत. ते कुणी चोर, डाकू, दरोडेखोर नव्हते. इंग्रज जेव्हा भारतातील जंगल संपवू पाहात होते, त्यावेळी जंगलात राहणाऱ्या याच ‘ठग’ समाजाच्या लोकांनी इंग्रजांना कडाडून विरोध केला होता. भारताच्या जंगलांमध्ये पिढ्यांपिढ्यापासून वास्तवास राहणाऱ्या या ‘ठग’ लोकांना ब्रिटिश सरकार संपवू पाहात होते, परंतु, ‘ठग’ लोकांनी इतका विरोध केला की इंग्रजांच्या नाकीनऊ आले होते.

- Advertisement -

पुस्तकांच्या माध्यमातून ‘ठगां’ची बदनामी

जमिनी ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी नवी युक्ती सुरु केली. या युक्तीनुसार त्यांनी पुस्तकांमधून ‘ठगां’ची डाकू, गुंड, दरोडेखोर अशी प्रतिमा निर्माण केली. यासाठी त्यांनी ‘अॅट्रॉसिटी लिटरेचर’चा आसरा घेतला. याच गोष्टीच्या साहाय्याने १८३९ साली फिलीप मोडोज टेलर या लेखकाने ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये ‘ठग’ हे कुख्यात लुटेरे, गुंड, खूनी सांगितले गेले होते. या पुस्तकाला आजही ‘ठगां’च्या ऐतिहासिक संदर्भांशी जोडले जाते.

‘ठगां’ना संपविण्यासाठी जीवे मारण्याच कायदा

ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये एक कायदा लागू केला होता, ज्या कायद्यानुसार ते भारतातील काही आदिवासी समाजाच्या लोकांना मारण्याचा अधिकार बाळगून होते. या अधिकारामुळे इंग्रजांनी आदिवासींच्या निष्पाप बालकांची देखील हत्या केली होती. इंग्रजांनी इतकी क्रुरता करण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे जंगलात राहणारे हे आदिवासी आपली जागा सोडण्यास तयार नव्हते. अशावेळी इंग्रजांनी त्यांना संपविण्यासाठी आपल्या मनाचे कायदे निर्माण केले. कित्येक आदिवासींचे शोषण केले. या हिंसाचारात आपली बाजू मांडण्यासाठी ब्रिटिश सरकारने कित्येक लेखकांना पैसे देऊन ‘ठग’ लोकांच्या विरोधात पुस्तके लिहिण्यास प्रवृत्त केले. त्यांनी ‘ठग’ लोकांना बदनाम करण्याचा इतका प्रयत्न केला की, समाज त्यांचा कधी स्वीकार करु शकणार नाही. या सगळ्या कारणांमुळे ‘ठग’ ही आजच्या काळातील शिवी बनली आहे. आज या शब्दाकडे हिंसा आणि आरोपीच्या नजरेने बघितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -