घरमनोरंजनतुनिषाला शीजानकडून हिजाबची सक्ती..आईच्या आरोपावरून आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

तुनिषाला शीजानकडून हिजाबची सक्ती..आईच्या आरोपावरून आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. 24 डिसेंबर रोजी तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. सुरुवातील शीजानला 4 दिवसाची पोलिस कोठडी झाली होती. या प्रकरणात त्याची कसूली चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप काहीही माहिती न मिळाल्याने शीजानच्या कोठीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

तुनिषाच्या आईने वालिव पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात खळबळजनक आरोप

- Advertisement -

तुनिषाच्या आईने वालीव पोलिसांना पुरवणी जबानीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच पहिल्यांदाच मिडीयासमोर येऊन वनिता शर्मा यांनी अप्रत्यक्षरित्या लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा संशय आपल्या आरोपातून व्यक्त केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शीजान तिला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरत होता. तसेच शीजान तुनिषाला हिजाब घालण्याची आणि उर्दू बोलण्याची सक्ती करायचा. शीजान आणि त्याचे कुटुंबिय देखिल तिला फसवत होते, असे गंभीर आरोप वनिता शर्मा यांनी केले आहेत.

तुनिषाला ओसीडीटचा आजार होता. याची माहिती असूनही शीजानने तिची फसवणुक केली. शीजानचे अनेक तरुणींशी प्रेमसंबंध होते. शीजानच्या मोबाईलमधील चॅटवरून तुनिषाला याची माहिती मिळाल्यावर तिने विचारणा केली तेव्हा शीजानने तिला मारहाण केली होती. त्यानंतर त्याने तुनिषाशी संबंध तोडले होते. मी स्वतः त्याला याबाबतीत समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा शीजानने उडवाउडवीची उत्तरे देऊन जे करायचे ते करा, असे मला सांगितले. असा आरोप वनिता शर्मा यांनी केला आहे. शीजानला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा निर्धारही वनिता शर्मा यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

तुनिषा प्रकरणी शीजान खानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -