घरताज्या घडामोडीNew Year 2023 : जल्लोषात, वाजत-गाजत करा नववर्षाचे स्वागत; पण नियम मोडल्यास होणार कारवाई

New Year 2023 : जल्लोषात, वाजत-गाजत करा नववर्षाचे स्वागत; पण नियम मोडल्यास होणार कारवाई

Subscribe

२०२२ सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२३ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे. राज्यातील हॉटेल, समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे.

२०२२ सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि २०२३ नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे. राज्यातील हॉटेल, समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. परंतु, नववर्षाचे स्वागत करत असताना शासनाने ठरवून दिलेले नियम किंवा कायदे मोडल्यास कारवाई सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. (New Year 2023 Welcome New Year Action Will Taken If Rules Broken Forest Department Appealed Maintain Sanctity)

नववर्षाच्या स्वागतासाठी खडकवासला, पानशेत, वरसगाव, पवना, भाटघर,गुंजवणी व इतर धरणे, हवेली, वेल्हे, भोर, मावळ,मुळशी, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांतील गडकिल्ले, पर्यटनस्थळे, फार्महाऊस, रिसॉर्ट व हॉटेल्सवर पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखावे व वन विभागाच्या हद्दीत असलेल्या पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करु नये असे आवाहन नागरिक व पर्यटकांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

अनेकदा उत्साहाच्याभरात तरुण-तरुणी, नागरिक किंवा पर्यटक मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन केल्यानंतर रस्त्यावर हैदोस घालणे, मोठमोठ्याने आरडाओरड करणे, बेदरकारपणे वाहणे चालवणे, मोठ्या आवाजात गाणे वाजवणे असे गैरप्रकार होताना दिसतात. परिणामी, याचा इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो व पर्यावरणाचीही हानी होते. तसेच शांततेचा भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी केली असून नियम मोडणारांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाचे नियोजन

- Advertisement -
  • हद्दीतील हॉटेल, फार्महाऊस व रिसॉर्ट मालकांची बैठक घेऊन नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • गैरप्रकार आढळून आल्यास हॉटेल मालकांवरही कारवाई होणार.
  • महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी असणार.
  • मद्यप्राशन करुन वाहन चालवताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार.
  • पोलीसांचे गस्ती पथक तैनात असणार.
  • पर्यटनस्थळांच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असणार.
  • गैरप्रकार आढळून आल्यास ११२ नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन.

हेही वाचा – माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -