घरमनोरंजन“हयांचं करायचं काय” १४ जून रोजी रंगभूमीवर

“हयांचं करायचं काय” १४ जून रोजी रंगभूमीवर

Subscribe

आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार व समीर चौघुले हया नाटकात प्रमुख भुमिकेत असून त्यांच्या विनोदाचा आविष्कार हया नाटकात पाहायला मिळणार आहे.

मराठी नाट्यसृष्टी आज भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. निखळ करमणूकीतून समाज प्रबोधन तसेच बौद्धीक विचारांना चालना देण्याचं काम खरं पाहिलं तर मराठी नाटकांतूनच गेली अनेक शतकं अव्याहतपणे चालू आहे. करमणुकीबरोबरच मानवी नात्यातील संघर्ष आणि ओलावा हया दोहोंची प्रचिती नाटकाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रतित होते. असंच करमणूकीतून सध्याच्या स्वार्थी नात्यांचं पदर उलगडून दाखवणारं “हयांचं करायचं काय” हे विनोदी नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार दि. १४ जून रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहे.

- Advertisement -

अमेय विनोद खोपकर प्रस्तुत “हयांचं करायचं काय” हया नाटकाची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली आहे. लेखक, दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनेते राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन, गीतरचना आणि संहिता संस्करण केले आहे. लेखन विशाल कदम, नेपथ्य व प्रकाश प्रदीप मुळये, वेशभूषा मंगल केंकरे, संगीत अजित परब व सुत्रधार गोट्या सावंत ही नामवंत मंडळी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली आहेत.

आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार व समीर चौघुले हया नाटकात प्रमुख भुमिकेत असून त्यांच्या विनोदाचा आविष्कार हया नाटकात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हया नाटकाद्वारे हे तीन विनोदवीर प्रथमच एकत्र येत आहेत. त्यांच्या धम्माल विनोदाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे.

- Advertisement -

“हयांचं करायचं काय” या नाटकाची कथा आहे. विजय आणि मंगल भुते या वृद्ध जोडप्याची. कोल्हापूरच्या एका आडगावात आपल्या वडीलोपार्जित वाड्यात ते राहतात. एक दिवस पोपट जाधव हा दलाल हा वाडा विकत घेण्यासाठी येतो आणि मग सुरू होते एकामागून एक धम्माल प्रसंगांची हास्यकल्लोळ मालिका. हास्य, शृंगार आणि करुणरसासारख्या नवरसांनी परिपूर्ण असे हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा निर्माता – दिग्दर्शकांना विश्वास आहे. नाटकाचा अनपेक्षित शेवट प्रेक्षकांना निश्चितच अंतर्मुख करणारा असून मनोरंजनाचे फुल पॅकेज हया नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -