घरट्रेंडिंगVideo: पाहा अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नृत्याविष्कार

Video: पाहा अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नृत्याविष्कार

Subscribe

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हीदेखील लॉकडाऊनच्या काळात तिचा आवडता नृत्याचा छंद जोपासताना दिसत आहे. तसे अनेक व्हिडिओ तिने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना प्रत्येक जण आपापल्या घरी क्वारंटाइन झालेला आहे. अशामध्ये कलाकार मंडळीदेखील त्यांचा वेळ वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवत आहेत. तसेच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अभिनेत्री संस्कृती बालगुडे हीदेखील लॉकडाऊनच्या काळात तिचा आवडता नृत्याचा छंद जोपासताना दिसत आहे. तसे अनेक व्हिडिओ तिने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. संस्कृतीला नृत्याची आवड आहे. तिने क्लासिकरल डान्सचे धडे घेतले आहेत. हे अनेकदाच्या नृत्यातून पाहायला मिळते. मात्र घरी असतानाही तिने तिची आवड जोपासली असून विविध प्रकारचे नृत्य सादर करून ती तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

- Advertisement -

सध्या सर्वच कलाकार घर बसल्या काही ना काही वेगळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मलायका अरोराने पहिल्यांदा बेसन लाडू बनवले. तर अनुष्का शर्माने राम नवमीच्या निमित्ताने छोले पुरीचा बेत बनवला. तसेच इतरही कलाकार त्यांचे त्यांचे घरातील कामाचे, टाईमपासचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यात संस्कृती देखील मागे नाही. असे नृत्याचे व्हिडिओ ती वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असते.


हेही वाचा – श्रीराम नवमीनिमित्त अनुष्काने केली खास ‘मेजवानी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -