घरमनोरंजनरितेश देशमुखचा पत्नीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

रितेश देशमुखचा पत्नीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

व्हिडिओतील दोघांचा प्रेमळ अंदाज त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. रितेश जेनेलियाला टाय बांधत असून जेनेलिया मात्र व्हिडियो बनवत आहे.

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश पत्नी जेनेलियाला टाय बांधताना दिसत आहे. या व्हिडिओतील दोघांचा प्रेमळ अंदाज त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. रितेश जेनेलियाला टाय बांधत असून जेनेलिया मात्र व्हिडियो बनवत आहे.

- Advertisement -

अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने रितेश देशमुख सोबत एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने सुंदर कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले की, “गाठ बांधताना कधी उशीर होत नाही.” जेनेलिया आणि रितेशच्या हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्रिटीसुद्धा या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.

- Advertisement -

दरम्यान हाऊसफुल ४ मधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल प्रमुख भूमिकेत दिसले होते. हा कॉमेडी चित्रपट होता. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांच्यासोबत मरजावा या चित्रपटात सुद्धा रितेश दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -