घरमनोरंजनविद्युत जामवालचा ‘सनक’चित्रपटातील जबरदस्त एक्शन अवतार!

विद्युत जामवालचा ‘सनक’चित्रपटातील जबरदस्त एक्शन अवतार!

Subscribe

एक नवीन धमाकेदार सोबतच जबदस्त एक्शन असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विपुल अमृतलाल शहा निर्मित या वर्षीचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट 'सनक' असे या चित्रपटाचे नाव आहे.

सध्या कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चक्रच विस्कळीत झाले आहे. सिनेसृष्टीलाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे चित्रपट बनवण्यापासून प्रदर्शित करण्यापर्यंत निर्मात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सामाजिक अंतर आणि सुरक्षितता प्रोटोकॉल पाहता चित्रपट निर्मात्यांना आपापल्या प्रकल्पांचे चित्रीकरण करण्याची नवीन आव्हाने आहेत. त्यासोबतच या महामारीच्या काळात एक्शन चित्रपटांचे शूटिंग निश्चितपणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. त्यामागील कारण म्हणजे त्यासाठी लागणारी अधिक मनुष्यशक्तची आणि सुरक्षिततेची अतिरिक्त आवश्यता होय. अशातच एक नवीन धमाकेदार सोबतच जबदस्त एक्शन असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विपुल अमृतलाल शहा निर्मित या वर्षीचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट ‘सनक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. अभिनेता विद्युत जामवाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून कनिष्क शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या या एक्शन पॅक चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्साह निर्माण झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

 विद्युत या चित्रपटात एक मध्यवर्ती भूमिका साकारताना सनक द्वारे एक इमोशनल ड्रामा ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अॅक्शन सिक्वेन्स आणि स्केलविषयी बोलताना दिग्दर्शक कनिष्क वर्मा यांनी स्पष्ट केले की, ”प्रेक्षकांनी मागील काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये विद्युतच्या काही सिग्नेचर एक्शन मुव्सला पसंती दिली. मात्र त्यांना सनक मध्ये या अभिनेत्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. आपण विद्युतला आतापर्यंत कमांडो किंवा स्पेशल फोर्स सारख्या भूमिकांमध्ये पाहिले पण सनक मध्ये विद्युत एक सामान्य नागरिकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विद्युतबरोबर शूट करणे सोपे होते कारण तो इतका जबरदस्त मार्शल आर्टिस्ट आहे की त्याला फक्त अ‍ॅक्शन कोरिओग्राफी लक्षात ठेवण्याची गरज आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

- Advertisement -

 झी स्टुडिओने सनशाईन पिक्चर्सच्या सहकार्याने सादर केलेल्या ‘सनक’ चित्रपटात विद्युत जामवाल सोबत नवोदित अभिनेत्री रुक्मिणी मैत्रे ही देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच अभिनेत्री नेहा धुपिया, चंदन रॉय सान्याल यांची खास भूमिका असणार आहे.


हे वाचा-  सलमान कठीण काळात पुन्हा फिल्म इंडस्ट्रीच्या पाठीशी, 25 हजार कर्मचार्‍यांना कोट्यावधींची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -