घरमनोरंजन'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार विजय देवरकोंडा; फर्स्ट लूक व्हायरल

‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार विजय देवरकोंडा; फर्स्ट लूक व्हायरल

Subscribe

करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड विश्वात लवकरच पदार्पण करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या हिंदी चित्रपटाविषयी बर्‍याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. ही अ‍ॅक्शन फिल्म असून LIGER हा शब्द LION & TIGER या दोन शब्दांनी बनलेला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन #SAALALACROSSBREED सह केले जात आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषण केली. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच करणने सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ असे असून या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

असा आहे फर्स्ट लूक

या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक करण जोहरने नुकताच शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये विजय देवराकोंडा एका फायटरच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावर विजयचा हा फर्स्ट लूक येताच त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, करण जोहर आणि त्याची संपूर्ण टीम सध्या या अगामी चित्रपटाच्या कामात गुंतलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

या आगामी चित्रपटाबद्दल विजय देवरकोंडा खूप उत्सुक आहे. त्यांनी करण जोहर यांच्यासाठी सोशल मीडियावर लिहिले की, “आम्ही जे विचार करतो ते आम्ही वास्तवात उतरवले.” आता आम्ही ही कथा संपूर्ण देशास दाखवू शकतो. आमच्या कथेवर विश्वास ठेवला आणि पाठिंबा दर्शविला, आपण या चित्रपटाच्या दमदार कलेक्शनची भरपाई करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -