घरमनोरंजनआता प्रेक्षकही म्हणणार, 'स्माईल प्लीज'

आता प्रेक्षकही म्हणणार, ‘स्माईल प्लीज’

Subscribe

'हृदयांतर' सिनेमानंतर फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस पुन्हा एकदा 'स्माईल प्लीज' म्हणत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन उपस्थित होता.

‘हृदयांतर’ सिनेमानंतर फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस पुन्हा एकदा ‘स्माईल प्लीज’ म्हणायला सज्ज झाला आहे. नकताच या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळा पार पडला. मुहूर्ताला बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने हजेरी लावली होती. हृतिक रोशनच्या हस्ते चित्रपटाला पहिला क्लॅप यावेळी देण्यात आला. मुहूर्तावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी चित्रपटातील आपापल्या पात्रांची ओळख अनोख्यापध्दतीने करून दिली. या प्रसंगी अमिषा पटेल, झरीन खान, रॉनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि ‘स्माईल प्लीज’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

Smile Please Team
स्माईल प्लीज

विक्रमचे काम मला माहित आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय आहे, ती अफलातून आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात स्पष्ट असल्यामुळेच तो, ती उत्तमरित्या साकारू शकतो. विक्रमच्या ‘हृदयांतर’ या चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळे तो सर्वांना कशा प्रकारे सामावून घेतो, याची मला कल्पना आहे. असं म्हणत अभिनेता हृतिक रोशनने विक्रमचं कौतूक केलं. तर दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणाले स्माईल प्लीज या चित्रपटाची कथा माझ्याखूप जवळची आहे. या कथेत मला कायम माझ्या आईचा भास होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्येकजण ‘स्माईल प्लीज’ नक्की म्हणेल.

- Advertisement -

हृदयांतर प्रमाणेया चित्रपटातही रसिकांना काहीतरी वैविध्यपूर्ण पाहायला मिळणार आहे. हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाला रोहन- रोहन ही जोडी संगीत देणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण मिलिंद जोग करणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -