घरमनोरंजनविराट कोहलीच्या हृदयात अनुष्का; 'हा' आहे पुरावा!

विराट कोहलीच्या हृदयात अनुष्का; ‘हा’ आहे पुरावा!

Subscribe

यावरून असे सिद्ध होते की, विराटचे अनुष्कावर जीवापाड प्रेम असून विराट कोहलीच्या हृदयात फक्त अनुष्काच आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपला अधिक वेळ घालवताना दिसतो. तसेच विराट कोहली आपले स्वतःचे फोटो देखील शेअर करताना दिसतोय. नुकताच विराट कोहलीने आपला एक फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट शांत बसलेला दिसतोय. हा फोटो कॅप्चर करण्यासाठी त्याने आपली पत्नी अनुष्का शर्माला त्याचे संपुर्ण श्रेय दिले आहे.

View this post on Instagram

?❤?

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

- Advertisement -

हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना विराट कोहलीने त्याच्या फोटोला “Caught in the moment. पिक क्रेडिट अनुष्का शर्मा” असे कॅप्शन दिले आहे. या फोटो कॅप्शन शिवाय अधिक कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या शेअर केलेल्या फोटोमध्ये जो टी-शर्ट त्याने घातला आहे. त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या वैवाहिक आय़ुष्यात आनंदी असल्याचे समजते.


हेही वाचा-  विरुष्काच्या ‘या’ फोटोवर होत आहेत मजेदार मिम्स व्हायरल

विराटने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केल्यानंतर फक्त ३ तासात या फोटोला १५ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. विराटचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत असून यात फोटोची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

- Advertisement -

टी-शर्टवर आहे ‘हा’ खास लोगो

या फोटोमध्ये विराट कोहलीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसतोय. या टी-शर्टवर एक खास लोगो दिसतोय. हा लोगो कोणत्या कंपनीचा नाही तर ते एक लाल रंगाचं हार्ट असून त्याखाली लाल रंगातच A असं अक्षर दिसतेय. यावरून असे सिद्ध होते की, विराटचे अनुष्कावर जीवापाड प्रेम असून विराट कोहलीच्या हृदयात फक्त अनुष्काच आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -