Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय ?’नेटकर्‍याच्या प्रश्नाला अंकिताने दिले मजेशीर उत्तर

‘फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय ?’नेटकर्‍याच्या प्रश्नाला अंकिताने दिले मजेशीर उत्तर

अंकिताने इंन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’या सेशन अंतर्गत चाहत्यांशी संवाद साधला.

Related Story

- Advertisement -

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर बॉलिवूड मधील चर्चित कपल पैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्याची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग असून ते अनेक रोमॅंटिक,फिटनेस तसेच अनेक बोल्ड फोटो चाहत्यासोबत शेअर करत असतात. मिलिंद आणि अंकिताच्या वयामध्ये ताबल 26 वर्षांचा फरक असल्याने लग्नानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आली होती. मिलिंद सतत त्याच्या फोटोशूट किंवा आगामी प्रोजेक्ट बद्दल नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असतो. नुकतच अंकितानेसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान एका चाहत्याने चक्क तिला फॅमिली प्लॅनिंग विषयी प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर अंकिताने अगदी मजेशीर अंदाजात देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy)

- Advertisement -

अंकिताने इंन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’या सेशन अंतर्गत चाहत्यांशी संवाद साधला. याचदरम्यान एका चाहत्याने तिला ‘तुमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. फॅमिली प्लॅनिंग विषयी काय विचार केला आहे?’ असा थेट सवाल केला. त्यावर अंकिताने सुद्धा चहत्याची मजा घेत ‘आम्ही एक प्लॅन फॉमिली आहोत’ असं उत्तर दिलं. सध्या अंकिताच्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर रंगत आहे.

अंकिता आणि मिलिंदने २२ एप्रिल २०१८ रोजी अलिबागमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर २०१९मध्ये अंकिता आणि मिलिंदने स्पेनमध्ये देखील लग्न केले. अंकिता आणि मिलिंदमध्ये २६ वर्षांचे अंतरअसल्यामुळे अनेकदा दोघेही ट्रोलिंगचा शिकार झाले अहेत.


- Advertisement -

हे हि वाचा – सिनेसृष्टी झाली अनलॉक, गोरेगाव फिल्मसिटीमध्ये शूटिंगला दिली परवानगी

- Advertisement -