घरमनोरंजनSandeep Nahar sucide case: धोनी चित्रपटातील सुशांतनंतर आता संदीपचीही आत्महत्या

Sandeep Nahar sucide case: धोनी चित्रपटातील सुशांतनंतर आता संदीपचीही आत्महत्या

Subscribe

संदीप नाहच्या आत्महत्येवर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होतेयं. संदीच्या आत्महत्येला त्याचा पत्नीला जबाबदार धरले जात आहे. कारण संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह व्हिडियोच्या माध्यमातून पत्नी आणि पत्नीच्या आई दोषी असल्याचे म्हंटले आहे. संदीप नाहरने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. परंतु संदीप नाहर कोण आहे? त्याचा सुशांत सिंह राजपूतची काय संबंध होता.संदीप नाहरचे खरे नाव नाहर संदीप होते. त्याला प्रेमाने अनेक जण रजनीश सँडी म्हणायचे. संदीपने हिंदीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या अभिनय कौशल्याचे अनेकांनी कौतुक केले. संदीपच्या अभिनय क्षेत्रातील वाटचाल साऱ्यांनात थक्क करणारी होती. सामान्य कुटुंबात वाढलेल्या संदीपचे वडील वन अधिकारी होते. त्यामुळे त्याचा वडीलांचीही इच्छा होती की, मुलानेही सरकारी नोकरी करावी. संदीपने इंजिनियरींगचे शिक्षण घेतले आहे. परंतु याचवेळी तो मॉडलिंग क्षेत्रात वळला.

संदीपने एका मुलाखती दरम्यान त्याच्या आयुष्याबद्ल सांगितले होते, २००७-०८ दरम्यान चंढीगडमधील मॉडलिंग शोमध्ये काम करताना संदीपचे पंजाबी व्हिडिओ साँग हिट ठरले होते. या व्हिडिओवरुन अनेकांनी त्याचे कौतुक केले. यावेळी अनेकांनी त्याला मुंबईत जाऊन बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्याचा सल्ला दिला.दरम्यान संदीपने थिएटर करतचं अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेतला. अभिनयाचे स्वप्न उराशी बाळगत संदीपने मुंबई गाठली. परंतु मुंबईत येताच त्याचे स्ट्रगलिंचे दिवस सुरु झाले. मुंबईत अभिनय कला आजमवण्यासाठी संदीपला कॅमेरा मिळत नव्हता. ६- ६ मुलांना एका कॅमेऱ्यासमोर सराव करावा लागायचा. त्यामुळे एक कलाकार होताना त्याला अनेक अडचणी आल्या. अभिनय तर जमत होता पण काम मिळणे कठीण झाले होते. टेलिव्हिजनवर २०१८-२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘कहने को हमसफर है’ या मालिकेतही तो झळकला होता. तर २०१४ मध्ये हॅप्पी गो लकी या मालिकेत त्याने रॉकी ही भूमिका निभावली. परंतु यावेळीही त्याला प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करता आले नाही.

- Advertisement -

याचदरम्यान संदीपला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. त्याने बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘एम,एस.धोनी’ या बायोपिकमध्ये महत्त्व भूमिका निभावली. त्यावेळी त्याच्या बिअर्ड लूकची मोठी चर्चा झाली. यानंतर त्याला बॉलिवूडमधील अनके चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. संदीपने नंतर बिअर्ड लूकचं कॅरी केला. अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ (Kesri) चित्रपटात, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही संदीपने विविध भूमिका साकारल्या होत्या.


हेही वाचा-अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येने नेटकरी आक्रमक, केली न्यायची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -