Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येने नेटकरी आक्रमक, केली न्यायाची मागणी

अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येने नेटकरी आक्रमक, केली न्यायाची मागणी

काय म्हटले आहे फेसबुक पोस्टमध्ये

Related Story

- Advertisement -

हिंदी सिनेसृष्टीत २०२० अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण बरेच चर्चेचा विषय ठरले आहे. तर सुशांत सिंह सोबत ‘एमएस धोनी’ या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अभिनेता संदीप नाहर संशयास्पद मृत्यू झाला आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार संदीपने आत्महत्या केले असल्याचे समजते आहे. बॉलिवूडला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कोरोना काळातही अनेक कलाकारांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे. नैराश्य, कामाचा त्रास, आर्थिक परिस्थिती अशाच बऱ्याच कारणांचे बळी कलाकार ठरले आहेत. संदीप नाहरने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली आहे. या फेसबूक पोस्टमध्ये आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर ही फेसबूक पोस्ट सोशल मिडियावर प्रचंड वायरल झाली आहे. यामध्ये संदीपने पत्नी आणि पत्नीच्या आईचा दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपुतच्या चाहत्यांनी सुशांतसोबत संदीपलाही न्याय देण्याची मागणी केली आहे.

संदीप नाहरने केलेल्या फेसबुक पोस्टच्या आधारे पोलीस अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. तर संदीपने आपल्या कारकिर्दीत अभिनेता अक्षय कुमारसह ‘केसरी’ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह ‘एमएस धोनी’ आणि ‘कहने को हमसफर है’ या चित्रपटांत काम केले आहे. संदीपने टीव्ही मालिकांमध्येही छोटे-मोठे रोल केले आहेत. अभिनेत्याने मृत्यूच्या ४ तासांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हटले आहे फेसबुक पोस्टमध्ये

- Advertisement -

मला तुम्ही चित्रपटात पाहिले असेल मी एमएस धोनी चित्रपटात छोटू भैयाचे पात्र साकारले होते. ही पोस्ट करण्याचे कारण असे आहे की, माझ्या खाजगी आयुष्यात मी अनेक संकटांना सामोरे जात आहे. माझी मानसिक दृष्ट्या स्थिर नाही आहे आणि याचे कारण माझी पत्नी कंचन शर्मा आहे. मागील २ वर्षांपासून मी खूप त्रास सहन करत आहे. मी माझ्या पत्नीला समजवून-समजवून थकलो आहे. वर्षाचे ३६५ दिवस रोज भांडण होत असते. भांडणात पत्नी नेहमी आत्महत्या करण्याच्या धमकी देत मला फसवण्याची धमकी देत असते. या परिस्थिती आणि भांडणांना मी आता कंटाळलो आहे. असे संदीपने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

संदीपने पुढे म्हटले आहे की, माझ्या कुटूंबीयांना शिवीगाळ करत असते. पत्नीसमोर मी माझ्याच घरच्यांचा फोन उचलू शकत नाही. सतत माझ्यावर संशय घेत असते. काही दिवसांपूर्वी भांडणामुळे पत्नी घर सोडून गेली होती. खूप शोधल्यानंतर सापडली होती. पत्नीची आई तिला मदत करत असल्याचेही संदीपने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पत्नी वारंवार देत होती.

- Advertisement -

आता मला जगण्याची इच्छा राहिली नाहीत. आयुष्यात अनेक सुख-दु:ख पाहिले आहेत. अनेक संकटांना समोरे गेलो आहे. परंतु आज मी ज्या परिस्थितून जात आहे ती असाह्य आहे. मला माहिती आहे की, आत्महत्या करणे पळपुटेपणा आहे. मला जगायची इच्छा आहे परंतु अशा जगण्यात काय मज्जा ज्यामध्ये आनंद नाही. माझी पत्नी कंचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधीही समजून घेतले नाही. आता मला सकाळी-संध्याकाळचे भांडण सहन करण्याची शक्ती नाही. यामध्ये पत्नीचा काहीही दोष नाही आहे. तिचा स्वभाव तसा असल्यामुळे तिला सगळे बरोबर वाटत असते. परंतु माझ्यासाठी सर्व सारखे नाही आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे. परंतु अशी वाईट वेळ माझ्यावर कधीही आली नव्हती असे संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -