घरमनोरंजनसर्वांना हसवणारी 'कॉमेडीक्वीन' भारती का रडली?

सर्वांना हसवणारी ‘कॉमेडीक्वीन’ भारती का रडली?

Subscribe

कधी निरागस लल्लीच्या रुपात तर कधी मस्तीखोर निवेदकाच्या भूमिकेत भारतीनं सर्वांनाच नेहमी हसवलं आहे. पण नुकताच भारतीच्या इन्स्टावरून एक व्हिडिओ पोस्ट झाला आहे. यामध्ये भारती रडताना दिसत आहे.

टीव्हीवर ‘कॉमेडीक्वीन’चा ताज मिरवणारी भारती सिंहला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ पासून सुरु झालेला तिचा प्रवास ‘डान्स दिवाने’ ची निवेदकपर्यंत चालू आहे. तिनं मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःची अशी एक ओळख निर्माण केली आहे. कधी निरागस लल्लीच्या रुपात तर कधी मस्तीखोर निवेदकाच्या भूमिकेत भारतीनं सर्वांनाच नेहमी हसवलं आहे. पण नुकताच भारतीच्या इन्स्टावरून एक व्हिडिओ पोस्ट झाला आहे. यामध्ये भारती रडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. का बरं रडत असेल भारती? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना? पण घाबरू नका. एका अॅपवर भारती रडण्याची अॅक्टिंग करत आहे.

काय आहे व्हिडिओ?

भारतीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून म्युझिकली अॅपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत आहे. तर मागे ‘हमारी अधुरी कहानी’ गाणं ऐकू येत आहे. पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारती का रडत आहे? असाच प्रश्न पडतो. पण यामध्येही भारतीची मस्ती दिसून येते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिचा कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा दिसून येतो. ‘यार, बघा मी किती चांगली अभिनेत्री आहे…मी फक्त कॉमेडीच नाही तर अभिनयदेखील करू शकते.’ अशा प्रकारचं कॅप्शन तिनं दिलं आहे. अर्थात ती व्हिडिओसह टाइमपास करत आहे.

- Advertisement -

लवकरच दिसणार ‘खतरों के खिलाडी’मध्ये

भारती लवकरच प्रसिद्ध रियालिटी शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये तिचा लाईफ पार्टनर हर्ष लिंबाचियादेखील सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा आहे. यासाठी दोघेही अर्जेंटिनाला रवाना झाले आहेत. तर सध्या भारती ‘डान्स दिवाने’ या डान्स रियालिटी शो मध्ये अभिनेता अर्जुन बिजलानीबरोबर होस्टिंग करताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -