घरमनोरंजनदेवीच्या मंदिरात वसू आणि आकाश मध्ये नवीन नातं जुळेल?

देवीच्या मंदिरात वसू आणि आकाश मध्ये नवीन नातं जुळेल?

Subscribe

‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, या मालिकेत सध्या वसू आणि आकाशच्या चुका- मुकीचा खेळ सुरु आहे. हे दोघेही अजून एकमेकांसमोर आलेले नाहीत. वसू आई- बाबांवर नाराज आहे कारण त्यांनी जे स्थळ आणलं होतं ते निरखून बघायला हवं होत असं वसूच म्हणणं आहे. त्या प्रसंगावरून वसू पुन्हा लग्नाचा विषय नको असा हट्ट धरते. आई आणि बाबा वसूच्या लग्नासाठी देवीकडे साकडं घालायचं ठरवतात.

ठाकूर कुटुंब सुद्धा त्याच देवीच्या दर्शनाला निघालेले आहेत. आकाशला काही कारणास्तव जाण शक्य होत नाही सगळे स्टेशनला पोहचतात. त्यातच बनी ट्रेन सोडून प्लॅटफॉर्म वर जातो आणि हरवतो आणि त्याची आकाशशी गाठ पडते. आणि गाडी सुटते. आकाश धावत्या ट्रेन मध्ये बनीला घेऊन चढतो आणि सुशीलाकडे म्हणजेच आज्जीकडे सुखरूप सोडतो आणि योगायोगाने तो ही देवीच्या दर्शनासाठी निघतो. वसूला समजते की आकाश ठाकुरनी बनीला सुखरूप ट्रेनमध्ये सोडलं. ती त्याचे आभार मानायचं ठरवते.आकाशला ट्रेनमध्ये पाहून ठाकूर कुटुंब खुश आहे.

- Advertisement -

जयश्रीची प्रार्थना देवीने ऐकली असं तिला वाटतं. अखिलला वसू आणि आकाशचं स्पेशल कनेक्शन लक्षात येतं. जिच्या मुलामुळे आकाश देवीच्या दर्शनासाठी सोबत येतो आहे तीच खरी त्याची होणारी बायको आहे हे तो अवनील पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे. त्यांना वसूच्या गळ्यातली आकाशची चेन दिसते. ट्रेनमधे जयश्रीची गाठभेट वसूशी होते पण वसूचं उद्धट इंप्रेशन जयश्री समोर निर्माण होतं. आता देवीच्या मंदिरात आकाश आणि वसूची खरंच भेट होऊ शकेल? जयश्रीचा वसू बद्दलचा गैरसमज दूर होईल? अवनीला वसू पसंत पडेल?

 

- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -