घरमनोरंजन'जरा हटके जरा बचके' सिनेमाची पहिल्याच दिवशी दमदार कमाई

‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाची पहिल्याच दिवशी दमदार कमाई

Subscribe

बॉलिवूड मधील कलाकार विक्की कौशल आणि सारा आली खान स्टारर सिनेमा ‘जरा हटके जरा बचके’ नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धिम्या गतीने त्याची सुरुवात झाली पण सेकेंड हाफमध्ये बॉक्स ऑफिसवर वेग पडकला. सिनेमाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच विक्की आणि साराची जोडी कमाल करतेय अशा ही प्रतिक्रिया दिल्या. (ZHZB Box Office)

सैकनिकच्या रिपोर्टनुसार प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.50 ते 6 कोटी रुपयांची उत्तम ओपनिंग केली आहे. त्याचसोबत उरी: द सर्जिकल स्ट्राइक नंतर जरा हटके जरा बचकेच्या लीड रोलमधील विक्कीचा दुसरा सर्वाधिक मोठा ओपनिंग सिनेमा ठरला आहे. सिम्बा, लव आज कल आणि केदारनाथ नंतर साराचा हा चौथा मोठा ओपनिंग सिनेमा आहे.

- Advertisement -

जरा हटके जरा बचके हा एकमेव हिंदीतील 3.35 कोटी रुपये कमावण्यास यशस्वी झालायं. ट्रेडनुसार विक्की-सारा स्टारर या सिनेमाचे बजेट याच जॉनरमध्ये रिलीज झाला होता. अन्य सिनेमांच्या तुलनेत फार कमी आहे. जर असेच सुरु राहिले तर सिनेमा ओपिनिंग वीकेंडला 22-25 कोटी रुपयांची कमाई करेल. (ZHZB Box Office)

- Advertisement -

जरा हटके जरा बचके मध्ये सारा अली खान आणि विक्की कौशल हे विवाहित कपल्सची भुमिका साकारत आहेत. परंतु या दोघांना असे वाटत असते की, त्यांचे हे नाते धोक्यात आहे. या सिनेमाला जिओ स्टुडिओज आणि दिनेश विजानने सपोर्ट केले आहे. मेडॉक्स फिल्म प्रोडक्शनला स्वयं लक्ष्मण, मैत्रेय बाजपेयी आणि रमिज खान यांनी लिहिला आहे.


हेही वाचा- ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते करणार 2 कोटींचा खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -