Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते करणार 2 कोटींचा खर्च

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते करणार 2 कोटींचा खर्च

Subscribe

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होती ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त 15 दिवस बाकी आहेत. या पुढील 15 दिवसांमध्ये निर्माता-दिग्दर्शक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडणार नाहीत. यासाठी निर्मात्यांनी मोठी योजना आखली आहे ज्यासाठी निर्माते मोठी रक्कम खर्च करण्यास तयार आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

‘आदिपुरुष’च्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

- Advertisement -

‘आदिपुरुष’ चित्रपटातील  ‘जय श्री राम राजा राम’ आणि ‘राम सिया राम’ मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. अशातच, हे भक्तीमय गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हे गाणं प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहे. तर प्रसिद्ध गायक सचेत आणि गायिका परंपराने हे गायले आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


 हेही वाचा : ‘आदिपुरूष’मधील हनुमानाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -