घरफिचर्सकलाकारांचे मार्केट

कलाकारांचे मार्केट

Subscribe

येथे अनेक मोठमोठे कलाकार खरेदीला येतात. काही जण तर चक्क रस्त्यावर बसून ब्रश, पेन्सिल, कलर निवडताना मी पाहिले आहे. येथे एक शेख चाचा होते. रस्त्यावर ब्रशचा धंदा करायचे. एक गोणपाट अंथरूण त्यावर हजारो ब्रश टाकलेले असायचे. आपण ब्रश निवडायचे आणि मग त्या ब्रशकडे बघून शेखचाचा किंमत सांगायचे. 1993 सालापर्यंत आमची त्यांच्याशी चांगली गट्टी जमली होती. गप्पा सुरु झाल्या की शेख काका भूतकाळात हरवून जायचे. ’मेरे पास से एम एफ हुसेन, मारियो जैसे कलाकार ब्रश लेकर गये है’ असे शेख चाचा अभिमानाने सांगायचे.

दक्षिण मुंबई ही खरी मुंबई. मात्र काळाच्या ओघात मुंबई अव्वाच्यासव्वा पसरली आणि दक्षिण मुंबईचे महत्व कमी झाले. पण आजही बाजार म्हटले किंवा मार्केटला जातोय कोणी सांगितले की डोळ्यासमोर दक्षिण मुंबईच येते. दक्षिण मुंबईतील बाजार आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. आगामी काळात ते अस्तित्वात असतील की नाही याविषयी शंका आहे. कारण मुंबई झपाट्याने बदलत आहे. होणारा विकास मात्र मुंबईची अस्सल ओळख पुसून टाकण्याच्या मागे लागला आहे. दक्षिण मुंबईतील चोर बाजाराबाबत मी याच कॉलममध्ये लिहिले होते. खरं म्हणजे त्यावेळेस मला स्वतःला तो लेख अपुरा वाटला होता. कारण चोर बाजार हा एका लेखात मावण्या इतका लहान नक्कीच नाही. चोर बाजाराच्या प्रत्येक सेक्शनबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे.

काल माझ्या एका मित्राचा फोन आला. म्हणाला, चोर बाजारात येणार का? मला काही ब्रश आणि कॅनव्हास घ्यायचे आहेत, हा माझा मित्र मोठा चित्रकार आहे. त्याच्यासोबत मी अनेकवेळा चोर बाजार पालथा घातला आहे. त्यामुळे लगेच तयार झालो.चोर बाजारात चित्रकलेचे साहित्य घाऊक आणि स्वस्त मिळते, त्यामुळे येथे अनेक मोठमोठे कलाकार खरेदीला येतात. काही जण तर चक्क रस्त्यावर बसून ब्रश, पेन्सिल, कलर निवडताना मी पाहिले आहे. येथे एक शेख चाचा होते. रस्त्यावर ब्रशचा धंदा करायचे. एक गोणपाट अंथरूण त्यावर हजारो ब्रश टाकलेले असायचे. आपण ब्रश निवडायचे आणि मग त्या ब्रशकडे बघून शेखचाचा किंमत सांगायचे. 1993 सालापर्यंत आमची त्यांच्याशी चांगली गट्टी जमली होती. गप्पा सुरु झाल्या की शेख काका भूतकाळात हरवून जायचे. ’मेरे पास से एम एफ हुसेन, मारियो जैसे कलाकार ब्रश लेकर गये है’ असे शेख चाचा अभिमानाने सांगायचे.

- Advertisement -

शेखचाचांचे खरेही होते कारण त्याकाळात जे जे स्कूल ऑफ आर्टमधील बहुसंख्य विद्यार्थी आपल्या साहित्याच्या खरेदीसाठी चोर बाजारात यायचे. जे जे हॉस्पिटलकडून गोलदेवळाच्या रस्त्यावर शिरले की उजव्या बाजूला येणार्‍या चोर बाजाराच्या गल्लीत त्याकाळी कलेच्या साहित्याचा बाजार भरायचा. ब्रश, रंग, पेन्सिल, स्टॅण्ड, कॅनव्हास तेथे विकायला असायचे. अर्थात ते सर्व वापरलेले अथवा काहीतरी लहानसा डिफेक्ट असलेले असल्याचे. पण बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत मिळायचे. ब्रशचे सतराशे साठ प्रकार, पुन्हा इंडियन, फॉरेन असे उपविभाग, रंगाचेही तसेच. कॅनव्हास पण वेगवेगळ्या क्वालिटीचे. रस्त्यावर असलेले कॅनव्हास पसंद पडले नाहीतर त्या विक्रेत्याला सांगायचे, मग तो अजून चांगले कॅनव्हास दाखवायला मागील चाळीच्या गल्लीत घेऊन जायचा. तेथे तर खजिना असायचा. त्यातून आपल्याला जे हवे असेल ते निवडायचे, भाव करायचा आणि पटले तर घेऊन जायचे.तेथे ए-4 साईजच्या कॅनव्हासपासून ते 60 बाय 80 फूट पर्यंतचे कॅनव्हास असल्याचे. इतकंच नाही तर दगडातून शिल्प घडवण्यासाठी लागणारे चिनी, हातोडी, फावडे असे साहित्यही मिळायचे.

काल मित्रांसोबत अनेक वर्षांनी गेलो तेव्हा या बाजाराला काहीशी अवकळा आली होती. म्हणजे बाजार होता तिथेच होता पण विक्रेते आणि गिर्‍हाईक पूर्वीसारखे राहिले नाहीत. खरेदी करणारे कमी आणि फिरायला आलेलेच जास्त दिसत होते. पुन्हा रस्त्यावरचा मालही कमी झाला होता. त्याबद्दल एका विक्रेत्याला विचारले असता तो म्हणाला की, आता पूर्वीसारखे दर्दी कलाकार कमी येतात. जे. जे. चे विध्यार्थी येतात पण त्यांची संख्याही कमी झाली आहे. काही हौशी लोक येतात पण त्यांना या गोष्टीचे ज्ञान नसते. त्यामुळे चांगल्या मालाची खूप कमी किंमत करतात तर खराब मालाला जास्त पैसे देऊन जातात. आता पूर्वी सारखा मालही मिळत नाही. पुन्हा जो आहे त्याच्या किमती वाढल्या आहेत. थोडक्यात काय तर चोर बाजाराचा हा विभाग आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. उद्या तो नाहीसा झाला तर नवीन कलाकारांचे मात्र खूप नुकसान होणार आहे.

- Advertisement -

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -