घरफिचर्सथलायवा!

थलायवा!

Subscribe

रजनीच्या सिनेमांचा उत्सव मी स्वतः बरेचवेळा अनुभवला आहे. माटुंग्याच्या खालसा कॉलेजला मी शिकायला होतो. आमचे कॉलेज सोडले आणि पुढे डॉन बॉस्को शाळा पार करून किंग्ज सर्कलच्या दिशेने निघालो की, अरोरा थिएटर लागते, हेच सिनेमागृह म्हणजे रजनीच्या सिनेमांचे उत्सव स्थळ. धारावीतून कामगार, कष्टकरी, बाया पोरे, म्हातारे कोतारे, पोरंपोरी भल्या सकाळी उठून रजनीअण्णांचा पिक्चर बघायला यायच्या. पहिल्या दिवशी थलायवाचा सिनेमा बघितला की आपले जीवन सार्थकी लागले, अशी त्या गरीब सरीब लोकांची श्रद्धा असे...ती आजही आहे, हे शुक्रवारी त्याचा ‘दरबार’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जाणवले.

This is the tribute to Thalaiva
मुछों को थोड़ा राउंड घुमाके
अन्ना के जैसा चश्मा लगाके
कोकोनट में लस्सी मिलके
आ जाओ सारे मूड़ बनाके

All the Rajini fans ..Thalaiva
Don’t miss the chance ..Thalaiva
All the Rajini fans ..Thalaiva
Don’t miss the chance Do this..
लुंगी डांस लुंगी डांस

- Advertisement -

जड़ो जवानी बड़ा जोर से वे जालमा
मैं ता रजनी दा फैन सी वे जालमा
जड़ो जवानी बड़ा जोर से वे जालमा
मैं ता रजनी दा फैन सी वे जालमा

डिस्को में जब ये गाना बजेगा
ओन दी फ्लोर आना पड़ेगा
लुंगी उठाना पड़ेगा
स्टेप करके दिखाना पड़ेगा]

- Advertisement -

All the Rajini fans ..Thalaiva
Don’t miss the chance ..Thalaiva
All the Rajini fans ..Thalaiva
Don’t miss the chance Do this..
लुंगी डांस लुंगी डांस

नाईट क्लब में आया मैं तो
मुझको रोकेगा कोन और काइको
मईरा मूड मई डांस करेगा
किसीका डैडी साईं नि डरेगा

जिसको जो बी है वो करना वो कर लो
इधर ही हूँ मैं खड़ा पकड़ लो
घर पे जाके तुम गुगल कर लो
मेरे बारे में wikipedia पे पढ़ लो
लुंगी डांस लुंगी डांस

कोन मुझसा है कोन
ओह बेबी यस आइ एम ए डॉन
नहीं मिलेगा मुझसा गो फाइंड इट
don’t angry me..mind it

अरे मेरे जैसे डांस किसको आता है
कोरिओग्राफर को मै ही सिखाता है
वो घर पे आता है
मुझसे सीख के जाता है
मुझसे सीख के लोगों को सिखाता है
लुंगी डांस लुंगी डांस…

खरेतर हे गाणे शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्प्रेस’ या सिनेमातील असून हनी सिंगने लिहिले आणि गायले आहे. हा सिनेमा संपतो तेव्हा हे गाणे सुरू होते आणि तुमच्या आमच्या समोर थलायवा उभा राहतो… या गाण्याच्या (म्हणूनच ते येथे संपूर्ण दिलेले आहे) रूपाने. ७० एमएम रजनीकांत! चित्रपट जगतातला एक चमत्कार!! आज रजनीकांतची आठवण येण्याचे कारण म्हणजे हा पडदा व्यापून राहिलेला हिरो ७० वर्षांचा होऊनही लोकांच्या तनामनात रुजून बसलाय… रजनीचा ‘दरबार’ नावाचा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि त्याच्या चाहत्यांनी मुंबईचा सायन माटुंगा परिसर दणाणून सोडला. धारावी, सायन, माटुंगा आणि मुंबईतील सर्व रजनीप्रेमींनी सायन पीव्हीआर थिएटरजवळ भल्या पहाटे जमा होत मुंबईची चेन्नई केली… दे धमाल! रजनीच्या पोस्टरला दुधाची आंघोळ घातली, रजनी ७० वर्षांचा झाला म्हणून ७० मुलींना साड्या वाटल्या, ७० चुली करून पोंगल साजरा केला. वाजता गाजत मद्रासी डान्स केला. बायकांनी लग्नातल्या साड्या आणि पुरुषांनी लुंग्या घालत घरचा समारंभ असल्यासारखा फर्स्ट डे, फर्स्ट शो साजरा केला…

रजनीच्या सिनेमांचा उत्सव मी स्वतः बरेचवेळा अनुभवला आहे. माटुंग्याच्या खालसा कॉलेजला मी शिकायला होतो. आमचे कॉलेज सोडले आणि पुढे डॉन बॉस्को शाळा पार करून किंग्ज सर्कलच्या दिशेने निघालो की, अरोरा थिएटर लागते, हेच सिनेमागृह म्हणजे रजनीच्या सिनेमांचे उत्सव स्थळ. धारावीतून कामगार, कष्टकरी, बाया पोरे, म्हातारे कोतारे, पोरंपोरी भल्या सकाळी उठून रजनीअण्णांचा पिक्चर बघायला यायच्या. पहिल्या दिवशी थलायवाचा सिनेमा बघितला की आपले जीवन सार्थकी लागले, अशी त्या गरीब सरीब लोकांची श्रद्धा असे… रजनी हा त्यांच्यासाठी माणूस नव्हता. तो देव होता. आपली दुःख दूर करणारा जणू तारणहार! यामुळे त्याची पडद्यावर एंट्री होताच थिएटर दणाणून जायचे… एकच गलका व्हायचा. आमचे सायन, माटुंग्याला राहणारे कॉलजचे मित्र मला रजनीच्या सिनेमाला ओढून न्यायचे. खरेतर आमच्यासारख्या मराठी मुलांना पाच एक वर्षे दक्षिणेचे मित्र सोबत असूनही मल्याळी, तेलगू, कन्नड या भाषा ओ की ठो कळलेल्या नसत… पण, आमचा मित्र शंकर नायर म्हणे, ‘अरे तुझे कोन बोलता की पिक्चर देख. अपना रजनी देख, बस. बाकी धमाल. स्टोरी बिरी गया तेल लगाने’ आणि नायर, सुब्रमण्यम, शेट्टी, पुजारी, सीताराम, सरिता, राधा, एस. संजय अशा सर्वांनी मिळून रजनीचा तो उत्सव कॉलेजच्या पाच वर्षात कधी चुकवला नाही…

धारावी, सायनवरून मद्रासी मोठ्या संख्येने बैलगाड्या सजवून त्यात रजनीचा भला मोठा फोटो हारबीर घालून, मद्रासी पिपाण्या आणि ढोल वाजत अरोरावर येऊन धडकत असत. आल्या आल्या ही तसबीर काढून त्याची जोरदार पूजा केली की, मग आत प्रवेश. पिक्चर सुरु झाला आणि थलायवा मोठ्या पडद्यावर आला की, सारे थिएटर डोक्यावर घेतले जायचे. घरून आणलेल्या आरत्या पेटवून रजनीला ओवाळले जात असे. यासाठी काही मिनिटे सिन थांबवला जायचा. पिक्चर दाखवणार्‍या ऑपरेटरला तशा स्पष्ट सूचना सिनेमागृह व्यवस्थापनाने दिलेल्या असत. यात काही चूक झाली की, त्या ऑपेरटरच्या पूर्ण खानदानाची वाट लावलेली असायची. मद्रासी मित्र या लाखोल्यांचे हिंदी भाषांतर करून सांगत तेव्हा हसून खाली पडायचे तेवढे आम्ही बाकी असू… आम्ही सिनेमा बघायला नाही तर एखाद्या देवळात आलो की, काय असा भास होत असे… आणि हे काय चाललंय यार,.. वेडे चाळे! असे मनातल्या मनात विचार येत असत पण, तिथपर्यंत.

कारण रजनी देव, त्याच्या करामती आणि सिनेमाला एका शब्दाने जरी आम्ही उलट पालट बोललो असतो तर मद्रासी लोकांनी आमची चटणी केली असती… त्यामुळे आम्ही बिगर मद्रासी चिडीचूप. बाकी सारा कल्ला! तर रजनीची एंट्री झाल्यानंतर बायांची आरत्या घेऊन ओवाळणी सुरू. त्यात बाप्यांच्या शिट्या, आरडाओरडा. पडद्यावर तांदूळ आणि पैसे फेकले जायचे. कोणीतरी डोअर किपरचा डोळा चुकवून पिपाणी आणलेली असायची आणि मग रजनी आला की, ती जोरजोरात आवाज करायाला लागायची. मग एकदा ही सगळी पूजा बिजा झाली की, रजनीचा एकपात्री शो सुरू व्हायचा. कधी तो पोट धरून हसवायचा, कधी धाय मोकलून रडवायचा, बर्‍याचदा खलनायक आणि त्याच्या साथीदारांना बुकलून काढायचा तेव्हा फक्त लोकांनी सिनेमागृहाची तोडफोड करायची बाकी ठेवलेली असायची…

हा सारा उत्सव अडीच तीन तास दे धमाल सुरु असायचा. लोकांच्या अंगात रजनीकांत आलेला असे. त्यांची दुनिया थलायवयाने भरून गेली असे… या काळात त्यांच्यासाठी बाकी जग शून्य. पिक्चर संपला की, त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान आयुष्य भरून पावले असे मला दिसत असे… खरेतर रजनीचा सिनेमा बघायला आलेली बहुतांशी माणसे ही हातावर पोट असणारी. पण त्या दिवशी जे काही खिशात असे ते त्यांनी पडद्यावर फेकलेले असायचे. त्या दिवशी धारावीत किती घरी चुली पेटल्या असतील, याची खात्री नसायची. पण… या सार्‍या गरीब सरीब माणसांना त्यांचा देव भेटलेला असे. प्रत्यक्ष देव कोणी बघितला नसला तरी त्या भोळ्या भाबड्या कष्टकर्‍यांसाठी रजनी देव म्हणून पृथ्वीवर आलेला असे. उलटी सुलटी सिगारेट बिडी पिणे, गॉगल गरगर फिरवत डोळ्यावर घालणे, हवेत उडी घेऊन खलनायकाची मुंडी आवळणे, एकाच वेळी पाच दहा गुंडांना बडवून काढणे, हवेत लाट्या काठ्या फिरवणे, बंदूक हातात खेळण्यासारखी फिरवत गुंडांना पळता भुई थोडी करणे हे सारे प्रकार आम्हाला जादूचे प्रयोग वाटत असले तरी रजनीचे सिनेमा हे दक्षिणेच्या लोकांचा जगण्याचा एका भाग असतो. ते आपल्या देवाशिवाय राहू शकत नाही. एकवेळ अन्न, वस्त्र, निवारा नसला तरी त्यांना चालेल, पण थलायवा दिसायला हवाच… देव आला पाहिजे!

कॉलेज संपले आणि रजनीचे सिनेमा बघणे थांबले. त्याचे हिंदी सिनेमा फार आले नाहीत आणि आले ते फार ग्रेटही नव्हते. दक्षिणात्य सिनेमांच्या हिंदी आवृत्या आल्या. यात रोबो, २.०, कबाली, शिवाजी, काला असे काही प्रमुख सिनेमा होते. पण, अमिताभ जसा हिंदी सिनेमा आपल्या सशक्त अभिनयाने व्यापून होता, तसे काही बॉलिवूडमध्ये रजनीला जमले नाही. मात्र रजनीला आणि त्याच्या फॅन्सना याची कधी पर्वा नव्हती. तो आपल्या एका वेगळ्या विश्वाचा अनभिषिक्त सम्राट होता आणि आजही आहे. ‘दरबार’ सिनेमात रजनी पोलिसाची भूमिका साकारत असून या पोलिसाने मुंबईसारख्या शहरातील ड्रग्सचं रॅकेट जाळण्याचं मिशन हाती घेतलं आहे, असे दाखवण्यात आले आहे. दरबार शुक्रवारी ४००० स्क्रिनवर शेअर झाला असून सिनेमा प्रदर्शित होताच चाहत्यांना आवडला आहे. ओपनिंग डेच्या दिवशी सिनेमाने चेन्नईत तब्बल २.२७ करोड रुपयांची कमाई केली आहे.

हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होताच माझी उत्सुकता चाळवली. मला अरोराचे दिवस आठवले. माझी सहकारी भाग्यश्रीने रजनीचा ‘दरबार’ आणि त्याच्या चाहत्यांचा उत्सव अनुभवला. ती सार्‍या उत्सवाचे भरभरून वर्णन करत होती आणि माझ्या पुढून साडेतीन दशकांचा काळ पुढे सरकत होता. आज रजनीने वयाची सत्तरी गाठली आहे. पण, त्याचा रुबाब पंचविशीतल्या नायकासारखा आहे. गुंड त्याच्या गाडीवर कालही गोळ्या झाडत होते आणि आजही फैरी चालू आहेत. पण, थलायवा गाडीतून खाली पाय टाकतो आणि गॉगल हातात गरगर फिरवून डोळ्यांवर चढवत एक पाऊल पुढे टाकताच समोरचे दहा वीस गुंड हवेत उडून जातात…रजनी आज वयोमानाने म्हातारा झाला आहे. डोक्यावर केस नाहीत, चेहरा आकसत चाललाय, शरीर मजबूत दिसत नाही. पण, रजनी फॅन्सना त्याची पर्वा नाही. त्यांच्या देवाला तर ती कधीच नव्हती. देव कधी म्हातारा होत नसतो…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -