घरफिचर्सगोड्या पाण्याच्या माशांचे एकमेव मार्केट

गोड्या पाण्याच्या माशांचे एकमेव मार्केट

Subscribe

साधारणतः एका दशकापूर्वी मुंबईत गोड्या पाण्याचे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण होते ते म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट. तेथे गोड्या पाण्याचे मासे हमखास मिळायचे. रात्रीच्या वेळी कर्नाटक, आंध्रप्रदेश अगदी पश्चिम बंगालमधून हे मासे घेवून ट्रक यायचे, ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये खाली केले जायचे, मग भल्या पहाटे या माशांचा तेथे बाजार भरायचा. रोहू, कटला, हिसला असे वेगवेगळ्या जातीचे मासे तेथे विकले जायचे.पण ते खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या खूपच कमी होती. एक तर हॉटेलवाले ते मासे खरेदी करायचे नाहीतर कोणीतरी बंगाली.

मुंबई हे बेट आहे. हे शहर चारही बाजूने समुद्राने वेढलेले आहे. त्यामुळे या शहरात मासे मिळण्यास कोणतीही अडचण नाही. पण एक अडचण नक्की आहे. मुंबईत मासे मिळत असले तरीही ते समुद्रातले, खार्‍या पाण्यातले. पण गोड्या पाण्यातल्या माशांचा या शहरात वनवाच आहे. या शहरात पूर्वी नद्या होत्या असे सांगितले जात असे. पण त्या इतिहासात लुप्त झाल्या आहेत. पुन्हा त्या नद्यांमध्ये खाण्यालायक मासे मिळायचे की नाही हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे मुंबईकर हा पक्का खर्‍या पाण्याच्या माशांवर पोसला जातो.

समुद्रातले मासे मग ते झवळापासून मोठ्या मोरीपर्यंत अगदी सहज उपलब्ध होतात पण गोड्या पाण्याचे मासे मात्र आजपासून दशकभर मागे मुंबईत सहज मिळायचे नाहीत. ज्याप्रमाणे कोलकातामध्ये गोड्या आणि खार्‍या पाण्याचे मासे सहज उपलब्ध होतात तशी स्थिती मुंबईची नव्हती. साधारणतः एका दशकापूर्वी मुंबईत गोड्या पाण्याचे मासे मिळण्याचे एकमेव ठिकाण होते ते म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट. तेथे गोड्या पाण्याचे मासे हमखास मिळायचे. रात्रीच्या वेळी कर्नाटक, आंध्रप्रदेश अगदी पश्चिम बंगालमधून हे मासे घेवून ट्रक यायचे, ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये खाली केले जायचे, मग भल्या पहाटे या माशांचा तेथे बाजार भरायचा. रोहू, कटला, हिसला असे वेगवेगळ्या जातीचे मासे तेथे विकले जायचे.पण ते खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या खूपच कमी होती.

- Advertisement -

एक तर हॉटेलवाले ते मासे खरेदी करायचे नाहीतर कोणीतरी बंगाली. या गोड्या पाण्याचा माश्यांना एकप्रकारचा हिवस वास असतो, मुंबईकर कितीही मासे खाऊ असला आणि माशांच्या वासाला सारवलेला असला तरीही त्याला या गोड्या पाण्याचा माशांचा वास सहन होत नाही, त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधील हे मासे विकणार्‍यांपासून मुंबईकर चार हात लांब राहायचा, ते क्रॉफर्ड मार्केटमधील कोळनिणा चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्याही असे मासे विकणार्‍यांना लांबच ठेवायच्या. परिणामी क्रॉफर्ड मार्केटमध्ये मासे बाजारात हे मासे विकणारे बहिष्कृत होते. पण हळूहळू मुंबईची परिस्थिती बदलली. मुंबईत पश्चिम बंगालमधून येणारे दागिना कारागीर, बांधकाम व्यवसायात काम करणारे मजुरांची संख्या वाढली. त्यामुळे त्यांच्यामार्फत गोड्या पाण्यातील माशांची मागणी होऊ लागली, हे मासे मोठ्या संख्येने खपू लागले. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधील मासे आणणार्‍या ट्रकची संख्याही वाढू लागली. इतकेच काय पण कधीकाळी ज्या कोळणी हे मासे विकणार्‍या लोकांना लांब ठेवायच्या आज त्यापैकी अनेक जणी हे गोड्या पाण्यातील मासे विकू लागल्या. काळानुसार मुंबईकरांची ही आवड बदलली.पावसाळ्यात जेव्हा खार्‍या पाण्यातील मासे मिळत नसल्याने महाग होतात तेव्हा चेंग म्हणून मुंबईकर हे मासे खरेदी करू लागला, ते त्याला आवडले आणि मुंबईकरांची या माश्यांना नाक मुरडण्याची वृत्ती संपली.

पुन्हा हे मासे खार्‍या पाण्यातील माश्यांपेक्षा स्वस्त असल्यामुळे त्याकडे ओढा वाढला. आज मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट या माश्यांना अपुरा पडत असल्यामुळे दादरला फुलबाजाराच्या बाजूला या गोड्या पाण्यातल्या माशांसाठी स्वतंत्र बाजार उपलब्ध करून घ्यावा लागला आहे. आजही क्रॉफर्ड मार्केटला हे मासे विकणारे अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे गर्दीही खूप असते पण आता मुंबईतील प्रत्येक लहानमोठ्या बाजारात हे गोड्या पाण्यातील मासे आता मिळू लागले आहेत. पण 10 वर्षांपूर्वी गोड्या पाण्यातील माशांचा मुंबईतील एकमेव बाजार हा क्रॉफड मार्केटच होता.

- Advertisement -

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -