घरफिचर्सयुपीएससी मेन्स परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काय कराल?

युपीएससी मेन्स परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काय कराल?

Subscribe

युपीएससीची परीक्षा देण्यासाठी लाखांमध्ये विद्यार्थी असतात. पण त्यापैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही टीप्स

युनियन सर्व्हिस पब्लिक कमिशनची मेन्स (मुख्य) परीक्षा २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. युपीएससीची परीक्षा देण्यासाठी लाखांमध्ये विद्यार्थी असतात. पण त्यापैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं अतिशय कठीण असतं. त्यामुळं युपीएससीची परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यासाठी काही टीप्स आम्ही देत आहोत. या टीप्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.

१. व्यवस्थित योजना आखा
युपीएससीच्या तयारीसाठी रोजच्या दिवसाच्या अभ्यासाची योजना असायला हवी. परीक्षेची तयारी करण्यासाठी रोज १० तास अभ्यास करण्याची गरज नाही. कोणत्या वेळी कोणता विषय हाताळणार याची योजना नीट तऱ्हेनं आखा. एकच विषय सतत वाचत राहिल्यास, वाचलेलं विसरण्याची शक्यता असते. त्यामुळं रोजचा स्टडी प्लॅन बनवणं गरजेचं आहे.

- Advertisement -

२. रोज वृत्तपत्रं वाचावं
युपीएससीची तयारी करत असल्यास, रोजचं वृत्तपत्र वाचणं अतिशय आवश्यक आहे. युपीएससीमध्ये वृत्तपत्रातील बातम्यांशी संबंधित बरेच प्रश्न येतात. रोजचं वृत्तपत्र वाचल्यामुळं तुम्हाला देशातील आणि जगातील घटनांसंबंधित माहितीबाबत तुम्ही जागरूक राहता. त्यामुळं वृत्तपत्र वाचण्याची सवय लावून घ्या.

३. NCERT ची पुस्तकं वाचा
मेन्सची तयारी करण्यासाठी योग्य पुस्तकं निवडणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ जितकं चांगलं स्टडी मटेरियल असेल तितकी चांगली तुमची परीक्षेची तयारी होईल. तज्ज्ञांच्या मते, युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी NCERT ची पुस्तकं वाचावी. विशेषतः सोशल सायन्सची पुस्तकांचा तुम्हाला जास्त उपयोग होतो.

- Advertisement -

४. मागच्या वर्षीचा पेपर सोडवा
विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षींचे पेपर सोडवणं आवश्यक आहे. ३ – ४ वर्षांपूर्वीपासूनचे युपीएससीचे पेपर सोडवल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होईल. त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या तऱ्हेचे प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज येतो.

५. आपल्या लिखाणाचं कौशल्य वाढवा
युपीएससी परीक्षेत यश मिळवण्याठी केवळ वाचून चालत नाही. तर तुम्हाला तुमच्या लिखाणाच्या कौशल्याकडेदेखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा विद्यार्थी केवळ अभ्यासाकडे लक्ष देतात. ही परीक्षा सब्जेक्टिव्ह परीक्षा असते. त्यामुळं लिखाणावर भर देणंदेखील गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -