घरफिचर्सरंगचिंतनात अर्थ संयोजन समाविष्ट

रंगचिंतनात अर्थ संयोजन समाविष्ट

Subscribe

भांडवली कलाकार कधीच आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाही म्हणून कलेसाठी कला या चक्रव्युहात अडकले आहेत आणि उपभोगी व्यवस्थेच्या चक्कीत भरडले जातात. थिएटर ऑफ रेलेवन्सने कलेसाठी कला या औपनिवेशिक आणि भांडवलदारी विचारांच्या चक्रव्युहाला आपल्या तत्वाने आणि सार्थक प्रयोगाने भेदले आहे.

भारत सरकार सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली आहे. ‘भारत सरकार’ आपले अर्थ तंत्र प्रत्येक नागरिकाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर पद्धतीने चालविते. म्हणजेच सर्वात शक्तिशाली तरी देखील नागरिकांकडून कर मागून जगते. ज्याच्यासाठी सरकार तोच ‘अर्थासाठी’ जबाबदार, हा एक सरळ साधा आर्थिक नियम आणि फॉर्म्युला आहे.

होय! या सरळ साध्या बाबीची व्यवहारिकता बराच गोंधळही निर्माण करते. सरकार कोणाला किती पैसे देते… का देते.. कशासाठी देते.. गरिबाला कमी, श्रीमंताला जास्त.. हा विवादित व्यावहारिक पक्ष आहे, पण हा प्राथमिकतेचा व राजनैतिक पक्षधारितेचा पैलू आहे…पण अर्थ कसे आणि कुठून संचयित होणार ते सूत्र सरळ आणि जसेच्या तसे स्पष्ट आहे. सगळ्यात श्रीमंत असणार्‍या भारत सरकारची तिजोरीसुद्धा गरिबी रेषेखाली राहणार्‍या नागरिकाकडून भरली जाते.

- Advertisement -

तो एक माचिस किंवा सुई विकत घेतल्याचा टॅक्ससुद्धा सरकारला देतो. श्रीमंतांची सरकारला चालवण्याची आणि लुटण्याची गोष्ट तर सर्वांनाच ठाऊक आहे.

स्वतंत्र अभिव्यक्तीकरिता जनहितासाठी तर जनतेचा आर्थिक सहयोग अनिवार्य आहे. हीच सोप्पी गोष्ट कलाकारांनी समजून घेणे आवश्यक आहे आणि हेच वैश्विक अर्थ चिंतन आहे. पण विकासाचे आणि विकसित होण्याचे मूळ मात्र भ्रमित केले जात आहे. उदाहरणार्थ विकसित युरोपियन मॉडेल जिथे कला आणि त्याच्या संबंधित संस्था निधी पोषित आहेत आणि त्यांचा हाच मॉडेल औपनिवेशिक देशांनी स्वीकारला आहे व आपल्याकडे त्यांच्या तालावर नाचणार्‍या कला प्रशिक्षण संस्था स्थापित केल्या आहेत, म्हणजे त्यांच्याच चिंतनाला स्वीकारले. म्हणजेच विकसनशील देश राजनैतिक बाजूने स्वतंत्र असूनही विकासाचे मापदंड आणि सांस्कृतिक चिंतन साम्राज्यवादी देशांचेच आहेत.

- Advertisement -

या ‘औपनिवेशिक चिंतनाला’ येथील तथाकथित पेशेवर कलाकार अंधपणे लागू करतात आणि त्याला हे मॉडर्न म्हणतात. खरंतर हे सांस्कृतिक गुलाम आहेत, जे आपल्या देशाचा वारसा आणि सांस्कृतिक चेतनेपासून लांब एका ‘औपनिवेशिक चिंतनाची’ नक्कल करत संपत चालले आहेत. कलेसाठी संसाधने नाहीत याचं दु:खं करत बसले आहेत.

‘औपनिवेशिक चिंतन’ वाले रंगगृह, त्यांची टेक्निक, त्यांची नाटकं, भारतीय बाजार आणि मध्यमवर्गीय प्रेक्षक, जो युरोप आणि अमेरिकेसारखा विकसित होऊ इच्छितो; पण सोबतच ग्लोबल वार्मिंगवर हाय हायही करत आहे. एकूण सगळेच कलाकार आणि प्रेक्षक मुखवटे लावलेले आणि दोघेही एकमेकांना ग्राहक व विक्रेता समजतात. कलाकार विचार करतो की, मी काय विकू आणि किती कमवू आणि प्रेक्षक विचार करतात की, मला काय मिळणार, माझं किती मनोरंजन होईल. म्हणजे यांच्यासाठी कला म्हणजे विक्री आणि खरेदी करणे. केवळ प्रॉफिट एंड लॉस! यातून जन्म झाला कलेसाठी कला या संधीसाधू विचाराचा. या सगळ्यामधून कलाकाराचा एक असा वर्ग तयार झाला जो म्हणतो मी कलाकार आहे. माझा जनसरोकाराशी काय संबंध. अशाच कलाकारांना सत्तेने पोषित केले आणि स्वतःच्या संस्थेत त्यांना प्रशिक्षण दिले आणि अशा समूहात सामील केले की, ज्यांच्यात कौशल्य तर आहे; पण चिंतन नाही. या कलाकारांच्या कंपूने असे भ्रम आणि खोटी समज पसरवली की, केवळ नाटकाने रंगकर्मी जिवंत राहू शकत नाही. नाटक करणे आणि त्यात जिवंत राहण्यासाठी सरकारी, निमसरकारी वित्त पोषण गरजेचे आहे आणि अनुदानाशिवाय रंगकर्म असंभव आहे.

अशा संधीसाधू आणि भ्रमिक चक्रव्यूहाला थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने भेदले. जनतेसमोर आपल्या रंग सिद्धांताला ठेवले आणि त्यांच्याकडून स्वतःच्या कलेला ओतप्रोत केले. थिएटर ऑफ रेलेवन्स रंग सिद्धांतानुसार प्रेक्षक सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे आणि पाश्चात्य चिंतनाच्या दिग्दर्शन आणि अभिनेता केंद्रित रंगकर्मापेक्षा प्रेक्षक आणि लेखन केंद्रित रंगकर्माला स्थापित केले. कारण प्रेक्षक सर्वात मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे.

भांडवली कलाकार कधीच आपली कलात्मक सामाजिक जबाबदारी घेत नाही म्हणून कलेसाठी कला या चक्रव्युहात अडकले आहेत आणि उपभोगी व्यवस्थेच्या चक्कीत भरडले जातात. थिएटर ऑफ रेलेवन्सने कलेसाठी कला या औपनिवेशिक आणि भांडवलदारी विचारांच्या चक्रव्युहाला आपल्या तत्वाने आणि सार्थक प्रयोगाने भेदले आहे आणि प्रेक्षकांच्या आयुष्याला सुंदर आणि शोषण मुक्त बनवण्यासाठी प्रतिबद्ध, प्रगतीशील, समग्र आणि समर्पित रंगदृष्टीशी जोडले आहे.

या नाट्य तत्वाला क्रियाशील करण्याकरिता प्रेक्षकांच्या आर्थिक सहभागीतेला सुरुवात केली आणि प्रेक्षकाला एक ग्राहक समजण्याऐवजी सहयोगी आणि सहभागी रंगकर्मी समजले. ज्याचे परिणाम स्वरूप पाश्चात्य नकल करणारे महागडे रंगगृह, नाटकाला लाईट आणि साऊंड शो बनवणारी टेक्निक, महागडे नेपथ्य आणि अनावश्यक जाहिरातीपासून सुटका मिळाली. सरकारी किंवा निधी पोषित कलेपेक्षा सार्थक आणि जनहितार्थ कला साधना करत आहे आणि आजही निरंतर सातत्याने सुरू आहे.

दृष्टी स्पष्ट तर सृष्टी स्पष्ट आणि सुदृढ असते. यामुळे संभ्रमातून मुक्तता मिळते आणि खूप वेळ वाचतो रंगसाधनेसाठी.प्रत्येक रंगकर्मीचे स्वप्न असते की, त्याच्या रंगकर्मासाठी सर्व संसाधने उपलब्ध असावीत. मग ती संसाधने राज्यव्यवस्थेने उपलब्ध करून द्यावी वा समाज व्यवस्थेने.. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, आणि मनातील गोष्ट आहे आणि मनातील गोष्ट प्रत्येक व्यक्तीला आवडते. पण रंगकर्म केवळ लोक लालसा किंवा हृदयाला स्पर्श करण्याइतपत मर्यादित कला नाही, रंगकर्म हृदयाला स्पर्श करून मेंदूच्या वैचारिक मंथनाची आणि चिंतन प्रक्रियेला वाढीस नेणारी, मानसिक रूढींना तोडणारी कला आहे. म्हणजे माणसाला माणूस म्हणून घडवणारे आणि टिकवणारे साधन आहे. एक असा व्यक्ती आणि समाज निर्माण करणारे साधन, जे न्यायसंगत आणि शोषणमुक्त असेल. जे मानवीय मूल्य, शांती, प्रेम आणि समानता असणारी व्यवस्था निर्माण करेल.

जेव्हा व्यवस्थेवर प्रश्न उचलला जातो तेव्हा विद्रोह होण्यास सुरुवात होते. जोपर्यंत उपभोगात्मक रंगकर्म करत आहात तोपर्यंत संसाधन उपलब्ध होत असतात. पण जेव्हा व्यवस्थेवर प्रश्न उचलणार्‍या तर्क संगत रंगकर्माची सुरुवात होते तेव्हा संसाधने विलुप्त होऊन जातात..

एक विश्लेषण करूया की, ज्या देशात राज्य व्यवस्था रंगकर्मासाठी संसाधन उपलब्ध करून देते, तिथे प्रगतिशील रंगकर्म होते का? जसे, अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश, विकसित देश…जिथे मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, तिथे कुठल्या नाटककारांनी आणि रंगकर्मीनी नरसंहार करणारी शस्त्र बनवणार्‍या आणि विकणार्‍या आपल्या देशाच्या नीतीचा विरोध केला आहे? कारण अमेरिकेच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शस्त्र बनवणे आणि विकणे. किती विरोधाभास आहे ना, युद्धात मानव आणि मानवतेला मारायचे आणि शांतीचा पाठ वाचायचा व विवाद करायचा की आम्ही शांती आणि मानवतेला वाचवण्यासाठी युद्ध करत आहोत.

दुसरे उदाहरण घेऊ ब्रिटनचे … हास्यास्पद बाब आहे…रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमेटिक आर्ट … इथून ब्रह्मज्ञान घेणार्‍या विद्यार्थ्यांनी देशातील शोषण आणि साम्राज्यवादी नीतीच्या विरोधात कितीदा आणि कितीवेळा रंग आंदोलन केले आहे. आपल्या देशात ब्रेख्तचे नाव सन्मानाने घेतले जाते; पण त्याच्याच देशात जिथे रंगकर्माची सर्व संसाधने उपलब्ध असूनदेखील रंगकर्म वेशीवर फेकले आहे. राज्य व्यवस्था पोषित सांस्कृतिक नीती असणारे सोव्हिएत सरकार का ढासळले. सोव्हिएत-भारत सांस्कृतिक आदान प्रदानाने ज्यामुळे आपल्या येथे जन रंगकर्मी जन्माला आले, ते का निरर्थक झालेत? हे प्रश्न माझ्या मेंदूत संचार करत आहेत आणि याची उत्तरे माझ्याकडे आहेत. हे की रूप म्हणजे फॉर्म्युला पुढे घेऊन जाणारे रंगकर्मी संसाधन संपूर्ण राहतील आणि प्रश्न उचलणारे आणि व्यवस्थेला आव्हान देणारे रंगकर्म, रंगकर्मी, रंग आंदोलन वा रंगनीति संसाधन विहीन राहणार….कारण हे चेतनेचे रंगकर्म आहे जे संसाधनांनी नाही तर प्रतिबद्धता म्हणजे उत्कटतेने चालते !

– मंजुल भारद्वाज (रंगचिंतक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -