घरफिचर्सलै बक्कळ जागा है..मुंबईत

लै बक्कळ जागा है..मुंबईत

Subscribe

विरारला असलेल्या चारशे पासष्ट चौरस फूट कार्पेट एरिया प्रशस्त घर, मोठ्या भव्य फ्लॅटची जागा बघून माझे तर माझे इथल्या लोकांचेही डोळे मोठ्ठे होतात... अन सुरू होतं...

मुंबईत जगातलं सगळं भेटलं, पन जागा भेटनार नाय…मुंबईत जागाच उरली नाही. जगात शहरासाठी दरडोई चौरस मीटर जागा लागते. मुंबईत मीटर सोडा फुटसुद्धा उरली नाही. मुंबईला फक्त सदिच्छा दौरे दिलेल्या लय जणांकडून मी असले ’आपल्याला माहीत आहे का, फ्लॅटचं कोटेशन ऐकलंत…शब्द ऐकले आहेत. पण एक हाडाचा मुंबईकर म्हणून मला यात असलेल्या फोलपणाची जाणीव आहे.  माझ्या मते मुंबई त्या महाभारतात असलेल्या द्रौपदीच्या थाळीसारखी है. येतील तेवढ्यांना अ‍ॅडजस्ट करत राहणारी. आपल्यामध्ये सामावून घेणारी. आता वाचणार्‍याला माझ्या या कागदावरच्या लायनी ’मुंबईची आत्मकथा’ या शीर्षकाखाली मराठी मिडीयमच्या सातवी ते नववी इयत्तेतील विद्यार्थी निबंध लिहतेत तसल्या वाटतील. पर भावाहो अन बहिनीहो मी बोलतोय…ही सत्य गोष्ट आहे. आता मी एवढे वर्ष बघालालोय मुंबईत झाडंझुडपं उगवतेत तशाच टाईपमध्ये जागा उगवत्यात. जमिनीवर तर जमिनीवर, लोकल ट्रेनमधीबि जागा उगवत्यात.

आता मुंबईतल्या तिन्ही लाईनची लोकं जे लोकल ट्रेननं जाऊन-युन ड्युट्या करत असतील त्यांना ही नसलेली जागा कशी बनती, त्याची प्रक्रिया चांगलीच माहिताय. त्यातल्या त्यात विरार ते चर्चगेट वाल्याला. सकाळची बेदम कामाची वेळ, फुल्ल गर्दी, जीव कोंडंन कोणत्याही वक्ताला अशी, तुमच्या पाठीवर जोर देणारा तुमचा सहप्रवाशी आता तुमच्या पाठीत घुसून पोटावाटे तुमच्या समोर भायेर यीऊन फुड्यात सांडंन, असली बाका परिस्थिती नायगाव भायंदरलाच. आता हजार डोळे असलेल्या इंद्रालासुद्धा इंचभर जागा रिकामी दिसणार नाही.

- Advertisement -

अशा परिस्थितीत मीरा रोडला त्यातून पाचदहा लोकांचा लोंढा ट्रेनमध्ये घुसतोय अन जागा नसलेल्या ठिकाणी जागा करून अडजस्ट होतोय. ही घटना दैवीच असली पायजेल ना…थोडक्यात मी आधी म्हणल्याप्रमाणे इथं नसलेल्या जागा उगवत्यात. आता हे झालं लोकलचं, तेवढ्यापुरतंच म्हणजे जागा उगवणार अन लोंढा उतरला का पुन्ना डब्बा जैसे थे, ओरिजिनल साईझमध्ये… पर डब्बा तो डब्बा आख्या मुंबईत आशा उगवलेल्या जागा दिसतील, ज्या उगवल्यात पर पुन्ना जैसे थे व्हायचं इसरल्यात. जसं आता तुम्हाला माहिताय की ही रस्त्याची जागा, ही फुटपाथची जागा, ही अलानी जागा, ती फलानी जागा… जर ती जागा एका ’क्ष’ गोष्टींनी व्यापली म्हणजे त्या जागी ’य’ गोष्टीला तात्पुरतं टेकायला दिलासा मिळणारा अपवाद…पण कायमचं टेकायला वावच नाही. पण, ये आमची तुमची सगळ्याची मुंबई है.. इथं भूगोलाचे, पदार्थविज्ञानातले, नागरिक शास्त्रातले नियम कशे लागू होतील. त्यामुळ कदाचित इथं मग तुम्हाला फक्त झाडं सोडून बाकी सगळं काही एकदम जोरदार उगवताना, फोफावताना खोलवर रुजताना दिसंल.

हम देखते थे ना पैले पुरा खुल्ला रोड था… फिर उसकी वडापाव, डोशा-समोशाही गाडी आई …अब तो पुरा खाऊ गल्ली बन गया है. आम्ही फूटपाथवर कपडे विकतो, पण धंदा झाला की तुमचा फूटपाथ जागच्या जागी…पण दुकानवाले त्यांनी शेड मारून जागा मारलीय त्याचं काय? रघुभाई कूच नही था वहा मालूम. एक स्टोव्ह लेके चाय बेचने का …मेरे सामने खिसकते खिसकते पुरा होटेल बनायला है… थोडक्यात काय मुंबईत जागा भरपूर हाय. दिसणार्‍याला दिसतीय असणार्‍याची असतीय, नसणार्‍याची बनतीय. अन आमच्यासारख्या लोकलकर्‍याला सवयच लागतीय, आपलं अंग चोरून,आपल्यात लपलेली, आपल्यासाठी असलेली जागा, आपल्या नकळत, कळत नं वळत कुर्बान करायची. अन अंग चोरून, दबून, चेपूनसुद्धा, आपल्याच धूनकीत आपल्याच मस्तीत बत्तेचाळीशीची छाती चौडी करून चालायची….
क्या बात! क्या बात! चाबूकच!
तेरे घर में रोटी जलेगी!
लेट्स रॉक!जय माता दी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -