Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग मग खुशाल करा लॉकडाऊन!

मग खुशाल करा लॉकडाऊन!

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन होऊन जवळजवळ एक वर्ष व्हायला आले. अजुनही लोकांनी खायचे काय? मुलांच्या शाळा कॉलेजची फी कशी भरायची? पोटाची भुक तोंड आ वासुन उभी आहे. आणि काय पुन्हा लॉकडाऊन ? लग्न वरातींना परवानगी दिली कोणी? व-हाडी मंडळीं बेछुट का वागत आहे? अशा अनेक प्रश्नांसमोर फक्त प्रश्नचिन्हच आहेत. लग्नसराई , सार्वजनिक कार्यक्रम , मोर्चे यांना वेळेतच आवार घालायचा होता. म्हणजे नियम धाब्यावर गेलेच नसते. वेळ गेल्यावर जागे होऊन काय फायदा? शाळा कॉलेजेस चालु करायची खरच गरज होती? आता वर्षभर ऑनलाइन शिकवले मग परीक्षा ही ऑनलाइन घ्या कि कुठे बिघडते? रोज दोन तास शाळा !!! काय म्हणावे… वैचारिकतेची कीव येते.अगोदरच दप्तराचे ओझे, प्रोजेक्टचा ससेमिरा, अभ्यासक्रम पूर्ण झाला कि वह्या, प्रयोग वहया पूर्ण करण्यासाठी सळो की पळा. त्यातुन मुले कसेतरी श्वास घ्यायचे पण आता तेही शक्य नाही. कारण आला कि मास्क तोंडावर!! का चिमुरड्यांचा बळी घ्यायचा? केरळ मधील जिंवत उदाहरण आपल्यासमोर आहेच. दहावी बारावीची परीक्षा महत्वाची की परीक्षा देणारी मुले? या वर्षी परीक्षा बोर्डाची नाही झाली तर काय बिघडणार? काहीही नाही.. दहावी बारावीच्या परीक्षा बोर्डाची न घेता. त्या त्या शाळा कॉलेजेस ने च पेपर काढावेत, परीक्षा घ्याव्यात. साहजिक निकालही त्यांनीच काढावेत.

ट्रेन न चालु करुन काय मिळाले? एस टी मध्ये तर उभे रहायला ही जागा नाही. शासन मंत्रीमंडळ नियम कायदे तयार करु शकता पण जनसामान्यांसारखा करोनाच्या काळात प्रवास करुन दाखवा, कुटुंबाचे पोट भरुन दाखवा.आहे का हिंमत? लोकांनी लाजलज्जा याची तमा न बाळगता जे जमेल ते कामधंदे चालु करुन कुटुंबाच्या पोटाची खळगी भरली आणि आजतागायत भरत आहेत. अहो करोना होईल किंवा झाला आहे या भीतीनेच कित्येक माणसे हार्टअटेक येऊन मरण पावली. काहींचे संसार देशोधडीला लागले, काम नाही, पैसे नाही म्हणुन आत्महत्या केली, तर काहींचे नाहक बळी गेले. याला जबाबदार कोण? ‘जगावर आलेले संकट, परिस्थिति ‘हेच उत्तर असेल. पण शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने सामान्य माणसाचे हाल किंवा बळी याला जबाबदार कोण असेल हे सांगायची गरज नाही ..ज्याचे जळते त्यालाच माहित.

- Advertisement -

आम्ही टाळ्या ,थाळ्या वाजवल्या.काळोख करुन मेणबत्या- दिवे लावले, कडेलोट बंदोबस्तात स्वत;च्याच घरात राहिलो . अजुन काय करायचे? पुन्हा लॉकडाऊन झाले तर माणसे घरात राहुन उपाशी मरतील…. त्यापेक्षा करोना होऊन मेलेले बरे कारण बायका मुलांची उपासमार तर होणार नाही. कुटुंबाचा हसरा चेहरा कष्ट पेलवण्याची व संकटाला सामोरे जाण्याचे धाडस देते.. लॉकडाऊन करायचे अाहे मग दरमाही कुटंबानुसार सर्व गरजा संपतील अशी खात्यामध्ये रक्कम पाठवा,अवाजवी येणारे विजबिल माफ करा .. मग खुशाल करा लॉकडाऊन!

– मयुरा म्हात्रे -अनगत (लेखिका, शैक्षणिक सदुपदेशक माजी मुख्याध्यापिका )

हेही वाचा- ‘राजकारणातील भुरट्या लोकांसोबतचे तुमचे फोटो पाहून खूप त्रास होतो महाराज’

 

- Advertisement -