घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकोरोनातून चीनने मिळवले काय?

कोरोनातून चीनने मिळवले काय?

Subscribe

कोविड १९ चा उगम नेमका कुठे झाला? त्याच्या प्रादुर्भावासाठी चीन जबाबदार आहे का ? माणसाकडून माणसाकडे याचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होतो हे माहिती असूनही ही माहिती चीनने जगापासून लपवून ठेवली का, आपल्या देशांतर्गत लोकांना एका गावातून दुसर्‍या गावाकडे जाऊ देण्यास प्रतिबंध घालणार्‍या चीनने आपल्या व अन्य नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी का घातली नाही असे प्रश्न आज उपस्थित झाले आहेत. शिवाय काही मान्यवर आणि विश्वसनीय शास्त्रज्ञांनी याबाबत विशेष माहिती दिली होती तिची प्रकाशात आणली गेली नाही असे आता दिसून येत आहे. या सर्वांमध्ये पंतप्रधान मोदी यांची कामगिरी विशेष उठून दिसत आहे. या संसर्गजन्य रोगाची लक्षणे आणि त्याचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव बघून डिसेंबर २०१९ मध्येच वुहान शहरामधील डॉक्टर्स भयचकित झाले होते. न्यूमोनियाचा हा प्रकार त्यांनाही नवा होता. आणि येणार्‍या रोग्यांना नेमकी काय औषध योजना करावी याच्या बुचकळ्यात ते पडले होते. साहजिकच डॉक्टर्सच्या मित्रगटांमध्ये त्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा चालू होती. त्यामध्येच होते एक डॉक्टर लिन वेन लियांग.

साधारणपणे २५ डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना याची माहिती देऊन सावध राहण्यास सांगितले. या वेळेपर्यंत ४०-५० पेशंट दाखल होऊनही त्यावर अधिकृत खुलासा दिला गेला नव्हता. लिन यांनी वी चॅट या व्हॉट्सअ‍ॅप सदृश चिनी अ‍ॅप वरती हा संदेश देऊन दोन तीन दिवस झाले नसतील की तेथील पोलिसांनी त्यांना बोलावणे पाठवले. आपण हा संदेश का लिहिलात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी उत्तर देऊनही पोलिसांचे समाधान झाले नाही. अखेर २८ डिसेंबर आसपास या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. शेवटी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांना सोडण्यात आले. यातून अन्य डॉक्टर्सना प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले होते. शिवाय ३० डिसेंबर रोजी प्रथमच चीन सरकारने अधिकृतरीत्या नव्या प्रकारच्या न्यूमोनियाचे रोगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत असे जाहीर केले. सोबतच ह्या रोगाचा प्रसार माणसाकडून माणसाकडे होत नसल्याचे सांगण्यात आले होते. या खुलाशामधून रोगाचे गांभीर्य कितपत आहे ते डॉक्टर्सना तसेच लोकांनाही समजणे कठीण होते.

- Advertisement -

याच दरम्यान म्हणजे चीन सरकारने ३० डिसेंबर रोजी खुलासा केल्यानंतर १ जानेवारी रोजी हाँगकाँगमध्ये याच विषयावर काम करणार्‍या डॉक्टर ली मेंग यानना त्यांच्या वरिष्ठांनी बोलावून घेतले व ह्यामध्ये काय माहिती मिळते ते तपासून बघ असे सांगितले. अखेर गुणसूत्रांचा अभ्यास केल्यावर १६ जानेवारी रोजी त्यांनी हे अनुमान काढले की हा व्हायरस नैसर्गिक नाही. तो कोणत्याही प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे माणसाला झालेला नाही. हा व्हायरस प्रयोग शाळेत ‘बनवला’ गेला आहे. त्याच्या एकूण सुमारे ३०००० पैकी ३००० गुणसूत्रांमध्ये बदल केला गेला आहे ज्या बदलामुळे त्याची दाहकता वाढली आहे असे त्यांच्या लक्षात आले होते. ह्या बाबीचा त्यांनी अधिक कसून तपास केला. अखेर आपल्या वरिष्ठांकडे हा विषय त्यांनी काढला. १९ जानेवारी रोजी वरिष्ठांनी त्यांना हा विषय बाजूला ठेव व अमुक अमुक विषयावर लक्ष केंद्रित कर म्हणून सांगितले. एक प्रकारे ली मेंग यान यांना त्या तपासातून बाहेर काढण्याचा विचार वरिष्ठ करत होते असा त्यांचा समज झाला होता. ली मेंग यान यांचे हे काम चालू होते तोवर जगामध्ये अन्य पावले उचलली जात होतीच.

एकीकडे चीन सरकारने नव्या न्यूमोनियाच्या रोग्यांची भरती झाल्याची कबुली दिली होती तर दुसरीकडे वुहान प्रयोगशाळेची सूत्रे हाती घेण्यासाठी एका चिनी लष्करी अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आले. ही बाब धक्कादायक होती. १८ वर्षांपूर्वी चीनने सार्स रोगाविषयी माहिती दडपून ठेवून दुष्ट हेतूने आपल्या नागरिकांना जगभर फिरू दिले त्यातून ३०० हाँगकाँगवासींना आपले प्राण गमवावे लागले होते. आता एका नव्या व्हायरसचा हल्ला ह्या सत्तेने आपल्यावर केला आहे, अशा अर्थाचे हे ट्विट होते. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. कारण या वेळपर्यंत रोगाच्या भीषण स्वरूपाची कोणालाच कल्पना आली नव्हती. २३ जानेवारी रोजी प्रथमच डेली मेल या वृत्तपत्राने एक लेख छापला होता. वुहान सदृश प्रयोगशाळेमधून एखादा भीषण व्हायरस निसटू शकतो असा इशारा शास्त्रज्ञांनी २०१७ साली दिला होता असे या लेखामध्ये म्हटले होते. २६ जानेवरीच्या वॉशिंग्टन टाइम्सच्या अंकामध्ये वुहान येथील प्रयोग शाळेमधून कोविड १९ व्हायरसचा प्रसार झाला असण्याची शंका व्यक्त केली गेली होती. याच दिवशी लॅन्सेट या प्रतिष्ठित सायन्स मासिकामध्ये सुमारे ४० ख्यातनाम शास्त्रज्ञांनी व्हायरसचा उगम वुहानच्या मच्छी बाजारात झाला नसल्याचे म्हटले होते. २७ जानेवारी रोजी केरळच्या त्रिचूर गावामध्ये एक २० वर्षीय युवती सुका खोकला व घसा दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली.

- Advertisement -

तिला ताप आलेला नव्हता तसेच श्वास पण लागलेला नव्हता. पण २३ जानेवारी रोजी तिने वुहान शहर ते कुमिनटांग शहर असा प्रवास ट्रेनने केला होता. आणि प्रवासामध्ये तिला स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये अनेक प्रवासी खोकल्यामुळे बेजार झालेले दिसले होते. २६ तारखेपर्यंत तिला कोणताही त्रास नव्हता. ती कोणत्याही कोविड रोग्याच्या संपर्कात आल्याचे तिला आठवत नव्हते. तसेच ती वुहानच्या मच्छी बाजारातही गेली नव्हती. ही बातमी येण्याच्या एक दिवस आधी बिझिनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने बातमी छापली होती की, वुहान शहरामध्ये सुमारे २५० भारतीय अडकले असून भारत सरकार त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी चीन सरकारच्या संपर्कात आहे. या तारखेपर्यंत चीनमध्ये मृतांची संख्या ५६ झाली होती आणि २००० हुन अधिक व्यक्तींना रोगाची लागण झाली होती, त्यामध्ये सुमारे २३ जण परदेशी नागरिक होते. २६ जानेवारी रोजी भारतीय दूतावासाने तिसरी हॉट लाईन चालू केली होती, त्यावर सुमारे ६०० कॉल्स येऊन गेले होते. वुहान शहरामध्ये लॉकडाउन २३ जानेवारी पासून लागू झाला होता.

चीनच्या अन्य १२ शहरांमध्ये हीच दक्षता घेतली जात होती. त्यामुळे या शहरांमधूनही भारतीय नागरिक अडकले होते. साधारणपणे जानेवारीचा शेवटचा आठवडा व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये चीनमध्ये चिनी नव्या वर्षाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जातो, त्या निमित्ताने मिळालेली सुट्टी पकडून अनेक भारतीय विद्यार्थी दोन आठवड्यापूर्वीच मायदेशी परतले होते. २३ जानेवारीपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या कचाट्यातून ते सुटले होते तरी काही विद्यार्थी मागे रेंगाळले होते. ते आता मायदेशी परतण्यास अधीर झाले होते. साथीच्या रोगाचे नियंत्रण करणार्‍या चिनी संस्थेच्या डॉक्टर्सनी सांगितले होते की हे विद्यार्थी भारतात परतले की त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज नाही, नुसते घराबाहेर न पडण्याचे बंधन पुरेसे ठरेल. त्यांना रोगाची काही लक्षणे दिसली तरच हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवावे. हा सल्ला तरी कितपत बरोबर होता. खरे तर दिशाभूल करणारा होता हे भविष्यात दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -