घरफिचर्ससारांशतारणहार डॉप्लर रडार!

तारणहार डॉप्लर रडार!

Subscribe

२६ जुलै २००५ च्या मुंबई ढगफुटी व शेकडो मृत्यूनंतर आपल्या देशात डॉप्लर रडार संख्या वाढत आता एकूण किमान ३२ रडार ही राष्ट्रीय संपत्ती आहे. देशातील डॉप्लर रडारांपैकी सर्वाधिक म्हणजे चार महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर या चार ठिकाणी हे रडार कार्यान्वित आहे. आता मंजुरी मिळालेले चार एक्स बँड रडार एकट्या मुंबईसाठी लवकरच दाखल होत आहे. यामुळे महाराष्ट्रात ही संख्या वाढून आठ होईल. औरंगाबादला अजून एक रडार हवे, अशी मागणी केली गेली आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटीओरोलॉजी (आयआयटीएम)चे मोबाईल डॉप्लर रडार हे ट्रकवर वाहून महाराष्ट्रात कुठेही नेता येईल असे खरेदी करण्यात आले आहे. याशिवाय गोवा येथील रडार उपयोगी ठरते.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ज्या असंख्य गोष्टी दिल्या त्यात डॉप्लर रडार यंत्रणा ही अशीच अत्यंत महत्वाची यंत्रणा होय. विशेषतः ढगफुटी आणि हवामान बदलाची खात्रीशीर व आगाऊ अलर्ट व माहिती देत लोकांचे प्राण वाचविण्यात डॉप्लर रडार यंत्रणांचे अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे या यंत्रणा जगभर वापरल्या गेल्या नसत्या तरच ते नवल होय. ढगफुटी (क्लाऊडबर्स्ट) म्हणजे ताशी शंभर मिलीमिटर किंवा जास्त दराचा पाऊस आणि त्यामुळे अत्यंत कमीवेळात येणारे महापूर म्हणजे जागतिक हवामान संघटनेच्या व्याख्येनुसार फ्लॅशफ्लड टाळण्यासाठी एक्स बँड (८ गिगा हर्टझ ते १२ गिगा हर्टझ) रडार यंत्रणा म्हणजे देवदूतच! मान्सून पॅटर्न बदल आणि हवामान तसेच वातावरण बदलाने कितीही ‘समस्यांच्या महापूर’ समोर आला तरी तारणहार डॉप्लर रडार यंत्रणा सज्ज असणे हे सोल्युशन आहे.

असे काम करते डॉप्लर रडार

- Advertisement -

डॉप्लर रडार यंत्रणा म्हणजे ढगांचा एक्स रे काढत अगदी बोटाच्या पेरा एवढ्या भागात किती पाणी, बर्फकण व पाण्याची वाफ आहे हे अत्यंत अचूक माहिती देत अक्षांश रेखांशानुसार किती वाजता किती पाऊस आपल्या डोक्यावर पडेल हे खात्रीशीर सांगणारी अशी ही यंत्रणा! सर्व सामान्यपणे एका डॉप्लर रडारची किंमत ४० कोटी रुपये इतकी असते आणि आठ तासाच्या एका शिफ्टमध्ये एक व्यक्ती देखील ही यंत्रणा हाताळण्यासाठी पुरेशी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टेड एक्स बँड डॉप्लर रडार बसविली तर ‘पांढरा हत्ती’ ओळख असलेल्या हवामान विभागात कुठल्याही माणसांची देखील गरज भासणार नाही आणि देशाचा खूप मोठा आर्थिक फायदा होईल इतके तंत्रज्ञान प्रगत झाले आहे.

डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडते. डॉप्लर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती चार ते सहा तास आधी अगदी सहज मिळू शकते. रडारच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कुठे कुठे होणार ढग वार्‍यावर स्वार होत कोणत्या दिशेला जात आहेत आणि त्यात किती पाणी कोणत्या स्वरुपात आहे हे लिक्विड वॉटर कंटेट (एलडब्लूसी) या घटकांचा चित्र रूप अभ्यास करुन समजते. किमान एक तास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक अचूक सांगता येते ज्यामुळे ही यंत्रणा देवदूत बनत लोकांचे प्राण वाचवते.

- Advertisement -

हवामान आणि डॉक्टर रडारचा देवदूत

जून १९५८ मध्ये अमेरिकन संशोधक डेव्हिड होम्स आणि रॉबर्ट स्मिथ यांनी चक्रीवादळाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर इफेक्ट तत्वाचा वापर केला आणि पुढे हवामानाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर रडारचा वेगाने प्रचारप्रसार जगभर होऊ लागला. ढगातील कणांची माहिती मिळते यामुळे ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी डॉप्लर रडार यंत्रणा ही जगभर आपत्कालीन यंत्रणा म्हणून सर्व प्रगत देश अचूक हवामान माहिती व अलर्ट अतिशय प्रभावीपणे वापरत आहेत.

मालामाल महाराष्ट्र!

२६ जुलै २००५ च्या मुंबई ढगफुटी व शेकडो मृत्यूनंतर आपल्या देशात डॉप्लर रडार संख्या वाढत आता एकूण किमान ३२ रडार ही राष्ट्रीय संपत्ती आहे. देशातील डॉप्लर रडारांपैकी सर्वाधिक म्हणजे चार महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर या चार ठिकाणी हे रडार कार्यान्वित आहे. आता मंजुरी मिळालेले चार एक्स बँड रडार एकट्या मुंबईसाठी लवकरच दाखल होत आहे. यामुळे महाराष्ट्रात ही संख्या वाढून आठ होईल. औरंगाबादला अजून एक रडार हवे, अशी मागणी केली गेली आहे. पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटीओरोलॉजी (आयआयटीएम)चे मोबाईल डॉप्लर रडार हे ट्रकवर वाहून महाराष्ट्रात कुठेही नेता येईल असे खरेदी करण्यात आले आहे. याशिवाय गोवा येथील रडार उपयोगी ठरते.

रेंजची पावर आणि देशप्रेमी हेतूंचा समुद्र!

इतर राज्यांच्या तुलनेत ५०० किलोमीटर परीघ एवढी रेंज असलेले डॉप्लर रडार हे जास्तीत जास्त एरिया कव्हरेज व लाभ महाराष्ट्र राज्याला मिळतो. डॉप्लर रडार यंत्रणेची पावर वाढवली की, रेंज वाढते हे साधे गणित आहे. त्यामुळे डॉप्लर रडारची पावर वाढवत काही हजार किलोमीटर रेंज वाढविणे कमी खर्चात शक्य आहे.
हिमालयात एका बँड डॉप्लर रडार बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एक्स बँड डॉप्लर रडार फक्त समुद्र किनारी बसवितात अशी पद्धतशीर अंधश्रद्धा काही लोक पसरवत आहेत, त्यामागे त्यांचे ‘देशप्रेमी हेतू’ तपासण्याची व खातरजमा करण्याची आवश्यकता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीची इच्छाशक्ती!

एखादी बाब शेतकरी व देशहितासाठी करताना सह्याद्रीची इच्छाशक्ती गरजेची अशते. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचेपा पांगफेडावेत ह विचार भारत भुमीतील प्रत्येक सुपुत्र करतो ही अभिमानाची बाब आहे..

मात्र मुंबईच्या कुलाब्यापासून नाशिकमध्ये चाऔदवड १८५ किलोमीटर इतक्या जवळ हवाईमार्गे आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी (सह्याद्री रांगांपलिकडल्या) नाशिकला डॉप्लर रडार देण्याची गरजच काय? असे लेखी कळणारे मुंबईच्या कुलाबा येथील रडार नवी मुंबईत रेंज पाहचत नाही म्हणून चार रडार किमान मुंबईसाठी द्यावेत अशी मागणी होते ही मोठी गंमत आहे.

शेती व उद्योगधंद्यासाठी नवसंजीवनी!

भारतीय अर्थव्यवस्था शेतीउद्योगाद्वारे मजबुतीकरण होण्यासाठी डॉप्लर रडार यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शेतकर्‍यांना अचूक हवामान माहिती मिळाली तर देशाची अर्थव्यवस्था कृषीक्षेत्राबरोबरच भरभराटीस येईल. म्हणूनच ढगफुटी, गारांचा मारा यावर एक्स बँड डॉप्लर रडारचा शेतकर्‍यांसाठी ‘अर्थपूर्ण’ फायदा देणारा उतारा ठरणार आहे.

कृष्णा खोरे आणि महापूर

भारतात रडार येण्याआधी हजारो लोकांना आपले जीव गमवावे लागले हा इतिहास आहे. कृष्णा खोरे आणि महापुराने राज्यातील होणारी जीवित व वित्तहानी ही सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकसाठी देखील डोकेदुखी ठरली आहे. सातारा, सोलापूर येथील शेती व निगडित उद्योगधंदे तसेच रोजगारावरदेखील याचा गंभीर व विपरीत परिणाम हा टाळता येणे खरंतर खात्रीने शक्य आहे.

मुंबई, सोलापूर आणि महाबळेश्वर तसेच लगतचे गोवा येथील रडार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला उपयोगी ठरते तर नागपूर रडारच्या उपयोग विदर्भासाठी होतो. मात्र उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकर्‍यांना रडार क्षेत्रापासून वंचित ठेवणे हे देशाच्या आर्थिक विकासासाठी निश्चितपणे मारक आहे. याउलट ढगफुटी व गारांच्या पावसाची पूर्वसूचना आदी अचूक हवामान माहिती आगाऊ मिळाल्याने सुयोग्य नियोजनातून नुकसानीवर मात करता येईल. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली सोलापूर आणि महाबळेश्वर येथील डॉप्लर रडार यंत्रणा वारंवार नादुरुस्त का व कशी असते हा संशोधनाचा विषय आहे. कृष्णा खोर्‍यातील महापूरानंतर जीवितहानी झाली की, मग तांत्रिक अडचणी एवढे कारण कागदावर लिहीले की काम संपले असे अजून किती काळ चालणार हा मानवी सभ्यता (ह्युमन सिव्हिलायझेशन) म्हणून तरी आपण विचार करणे गरजेचे आहे.

मुंबई ते गोवा हे अंतर ५८४.५ किलोमीटर आहे आणि मुंबई तसेच गोवा येथील ५०० किलोमीटर परीघ एवढ्या रेंजचे डॉप्लर रडार कार्यान्वित असताना ढगफुटीची सूचना कोकणवासीयांना तसेच चिपळूणकरांना न देण्यामागे किंवा दिली तरी जनसामान्यांना न मिळण्यामागे काय तांत्रिक कारण आहे याचा शोध अभ्यासकांनी घेण्यास हरकत नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा तीनही जिल्ह्यातील ढगफुटींमध्ये शेकडो जीव गेलेत. तसेच वित्तहानी झाली आहे. एतकेच नाही तर ठाणे येथे ही ढगफुटी झाली पण मुंबईच्या रडारने अलर्ट दिला तर तो ठाणेकरांना तसेच पालघरकरांना का मिळाला नाही ही प्रश्न पडतो.

अनेकदा बरोबर आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील चारपैकी तीन रडार बंद असतात ही वस्तुस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच इतर अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे आणि त्याची दखलदेखील त्यांनी गांभीर्याने घेतली ही या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र अजूनही डॉप्लर रडार यंत्रणा प्रभावी वापरून मुंबई-पुणेसह कृष्णा खोरे तसेच ढगफुटींचा प्रदेश बनलेल्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात खूप वाव आहे. मुंबईत येणार्‍या नवीन चार एक्स बँड डॉप्लर रडारपैकी किमान एक-एक उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा येथे वर्ग करण्याची मागणी सकारात्मक प्रतिसाद आहे.

डॉप्लर रडार यंत्रणेची जन्मकथा!

डॉप्लर रडारची विज्ञानकथा १७९ वर्षे जुनी आहे. ऑस्ट्रियाचे भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन डॉप्लर आकाशगंगेतील ग्रहतारे यांचा अभ्यास करीत होते. १८४२ साली अचानक गणिती आकडेमोड करीत असताना त्यांना आढळले की, काही तरी गडबड होते आहे. मग त्यांनी पुन्हा पुन्हा आकडेमोड केली. आणि एका रात्री तर युरेका युरेका म्हणत चक्क ते उडालेच. आपल्या खोलीत ते ओरडू लागले आणि कुणाला सांगू आणि कुणाला नाही अशी त्यांची अवस्था झाली. एखादी वस्तू दूर जात असताना किंवा जवळ येत असताना त्यावर रेडिओ लहरी सोडल्यास त्या परतताना आपली फ्रिक्वेन्सी बदलतात हे सृष्टीचे एक कोडे उलगडल्याचा परमानंद त्यांना झाला होता. हा एक नवीन शोध होता – हाच तो डॉप्लर इफेक्ट!

पुढे ९७ वर्षे त्यांच्या या शोधाकडे दुसरे महायुद्ध होईपर्यंत कुणी ढुंकूनही पाहिले नाही. १९४५ साली बाय बॅलेट या संशोधकाने ध्वनी लहरींनी डॉप्लर इफेक्ट पडताळून योग्य असल्याचे सांगितले. मग अस्तित्वात आले डॉप्लर इफेक्ट या वैज्ञानिक तत्वावर चालणारे रडार म्हणजे डॉप्लर रडार!

डॉप्लर इफेक्टचे फायदे

विशेष म्हणजे डॉप्लर इफेक्ट हा ग्रहतारे आणि हवामान याची अचूक माहिती घेण्यासाठी जसा वापरला जातो तसेच रक्तातील प्रवाह व गुठळ्या शोधणारे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात, तसेच हायवेवर वेगमर्यादा तोडत भरधाव वेगाने धावणारी वाहने पकडण्यासाठी पोलीस वापरतात ती स्पिडगनदेखील याच विज्ञान तत्वावर काम करते हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -