घरफिचर्ससारांशदुग्ध उद्योगाचे वेगळे मॉडेल

दुग्ध उद्योगाचे वेगळे मॉडेल

Subscribe

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील शंतनू नानासाहेब पाटील यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत डेअरी उद्योगाचे वेगळे मॉडेल उभे केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेत त्यांनी दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत स्वमालकीची यंत्रणा उभी केली. यामुळे दूध तसेच प्रक्रिया उत्पादनांची गुणवत्ता वाढली, त्याच बरोबरीने पशुपालकांच्या आर्थिक नफ्यात वाढ झाली आहे.

अंगात कर्तृत्व, झेप घेण्याची उर्मी आणि जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येते. याचा प्रत्यय आणून देणारे दुग्ध व्यावसायिक लासलगाव येथील युवा उद्योजक शंतून नानासाहेब पाटील यांनी आपली ओळख दूध संकलन केंद्रातून निर्माण केली आहे. पहिल्या दिवशी दोन लिटर दुधाचे संकलन करून कामकाजाला सुरवात झाल्यानंतर आता ७ हजार लिटर दररोज दुधाचे संकलन केले जात आहे. आपल्या कर्तृत्वाने ‘व्हाईट डीलाईट प्रा.ली हा डेअरी इंडस्ट्री’ ब्रँड निर्माण केला.

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील शंतनू नानासाहेब पाटील यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत डेअरी उद्योगाचे वेगळे मॉडेल उभे केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेत त्यांनी दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत स्वमालकीची यंत्रणा उभी केली. यामुळे दूध तसेच प्रक्रिया उत्पादनांची गुणवत्ता वाढली, त्याच बरोबरीने पशुपालकांच्या आर्थिक नफ्यात वाढ झाली आहे.

- Advertisement -

शंतनू नानासाहेब पाटील हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये नोकरीला होते. मात्र, ग्रामीण भागात स्वतःचा शेती आधारित उद्योग उभारण्याच्यादृष्टीने त्यांनी नोकरी सोडली. परिसरातील शेतकरी आणि व्यावसायिकांशी चर्चा करत शंतनू यांनी डेअरी उद्योगाची निवड केली. पारंपरिक पद्धतीने व्यवसायाचे नियोजन न करता माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आधुनिकता आणली. या माध्यमातून ४० तरुणांना प्रत्यक्ष आणि २००० दूध उत्पादकांना अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत.

गावामध्येच शेतीपूरक उद्योग उभारण्याचा ध्यास त्यांनी घेतला. साधारणपणे २०१५ मध्ये कंपनीमधील नोकरी सोडून फलोत्पादन, संरक्षित शेती आणि दुग्ध व्यवसायाबाबत त्यांनी तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकर्‍यांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्वेक्षण करून सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. त्यानुसार येथे डेअरी उद्योगाची निवड केली. डेअरी उद्योगाची सुरुवात शंतनू पाटील यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये लासलगावमध्ये ‘कान्हा डेअरी इंडस्ट्री’ या नावाने व्यवसायाला सुुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन लिटर दुधाचे संकलन करून कामकाजाला सुरुवात झाली. त्यांनी परिसरातील पशुपालकांच्या गरज लक्षात घेतल्या. अजूनही ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने डेअरीचे कामकाज होत असल्याने पशुपालकांना मिळणारा मोबदला आणि व्यवहारात पारदर्शकता कुठेच नाही.

- Advertisement -

यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यापासूनच बदल केला. यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव उपयोगी पडला. दूध संकलन प्रक्रियेतून पशुपालकांना योग्य दर आणि ग्राहकांना योग्य गुणवत्तेचे दूध उपलब्ध होण्यासाठी स्वयंचलित दूध संकलन यंत्रणा कार्यान्वित केली. यामुळे कामाकाजात गती आली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर लासलगाव हे व्यापारीदृष्ठ्या महत्वाचे गाव आहे. पाटील यांच्या डेअरीची निफाड, चांदवड व येवला तालुक्यांमध्ये तेरा दूध संकलन केंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून दोन हजार पशुपालक जोडले गेले आहेत. येत्या काळात नवीन गावांमध्ये संकलन केंद्रांच्या उभारणीचे नियोजन सुरू आहे. योग्य नियोजनामुळे तीन तालुक्यांमध्ये दूधदरामध्ये स्पर्धा निर्माण झाली.

शंतनू पाटील यांनी प्रत्येक दूध उत्पादकाला बँक खाते उघडणे अनिवार्य केले. यामुळे डेअरीमध्ये दिलेल्या दुधाचे पैसे मस्टर भरल्यानंतर त्याच दिवशी थेट बँक खात्यात जमा केल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये पैशांची सुरक्षितता वाढली. व्यवहारांच्या नोंदी होऊ लागल्याने पशुपालकांची पत तयार झाली आहे. शहरांमध्ये मिळविली बाजारपेठ दररोज सात हजार लिटर दुधाचे संकलन करून त्यावर शीतकरण प्रक्रिया केली जाते. मागणीनुसार विक्री केली जाते. व्यवसायाचा विस्तार करताना शंतनू पाटील यांनी अधिक नफ्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. गेल्या ५ वर्षांच्या व्यावसायिक वाटचालीत त्यांनी विक्री व्यवस्था सक्षमपणे उभी केली. नाशिक, पुणे शहरांतील कंपन्यांच्या कँन्टीनसाठी दूध तसेच प्रक्रिया युक्त पदार्थांचा पुरवठा केला जातो. कुशल मनुष्यबळाची साथ पाटील यांच्या डेअरी उद्योगात दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्रीसाठी एकूण ४० जणांना रोजगार मिळाला आहे.

यामध्ये समूहातील सहकारी अमोल खैरनार यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. त्याच ताकदीवर संकलन, वाहतूक, शितकरण प्रक्रिया, दूधपुरवठा, हिशोब, दुग्धप्रक्रिया आणि विक्री ही सर्व कामे नियोजनपूर्वक होतात. दृष्टिकोन असेल तर वेगळेपणाने काम उभे राहू शकते हे शंतनू पाटील यांनी दाखवून दिले आहे. शंतनू पाटील पशुपालन आणि डेअरी व्यवसायामध्ये आणलेली आधुनिकता लक्षात घेऊन विविध संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्याचबरोबरीने पशुसंवर्धन विभागानेदेखील त्यांना विशेष पुरस्काराने गौरविले आहे.

–राकेश बोरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -