घरफिचर्ससारांशजादुई संत एल्मो’ज फायर!

जादुई संत एल्मो’ज फायर!

Subscribe

गंमत म्हणजे कितीही पाणी ओता संत एल्मो’ज फायरची विद्युतज्योत विझत नाही. आणि तिची घातकता संपते तेव्हा तिने सर्वकाही स्वाहा केलेले असते. संत एल्मो’ज फायर आणि विजांमध्ये फरक आहे ही गोष्टदेखील लक्षात घ्यायला हवी. अनेक देशात शस्त्रसाठा आणि लढाई, फटाके इत्यादींमध्ये वापरला जाणारा दारूगोळा यांच्या स्फोटामागे शत्रूदेशाचा घातपात नसून अनेकदा संत एल्मो’ज फायर कारणीभूत ठरली आहे हे ‘एक्स फाईल’ किंवा ‘सिक्रेट फाईल’ मध्ये नोंदविले गेले आहे. संत एल्मो’ज फायरमुळे सर्वत्र आगी लागतात का? हे एक कुतुहल सर्वांनाचे असते आणि त्यामागचे विज्ञान समजून घेण्यासाठी अतिशय सोपे आहे. संत एल्मो’ज फायर सर्वत्रच आगी लावत नाही हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी यामागे ही विज्ञान लपलेले आहे.

‘संत एल्मो’ज फायरची (Sant Elmos fire) कथा आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला जावे लागेल इसवीसन 1753 पर्यंत! हा असा काळ होता जेव्हा इटालियन संत एल्मो हे नाविकांचे आजच्या भाषेतले ‘मेंटोर’ किंवा मार्गदर्शक-गुरू मानले जायचे. अनेकदा वातावरणातील विद्युत ऊर्जेमुळे विशिष्ट शलाका चर्चच्या टॉवर्सवर व जहाजांच्या शिडांवर प्रकट व्हायची आणि मग अंधारात असंख्य नाविकांना अचानक दिसायचा चमचमता प्रकाश! होकायंत्र गरागर फिरू लागली की, ही भुताटकी आहे की निसर्गाचा चमत्कार? या प्रश्नाने अथांग सागरातील एकटेपणात डोकेही गरगरू लागायचे. पुढे कुणाला तरी युक्ती सुचली आणि मग सर्वांच्या मनाला मिळाला मोलाचा आधारस्तंभ ठरलेला विचार! तो म्हणजे हा प्रकार दुसरे तिसरे काही नसून हा आहे आपले गुरुदेव म्हणजे संत एल्मो यांचा नाविकांसाठीचा आशीर्वाद!

काळाच्या ओघात शास्त्रज्ञांनी याचा शोध घेतला आणि या आशीर्वादामागेचे विज्ञान हुडकून काढले. पुढे शोध लागत गेला की असे हा अद्भूत नयनरम्य जीवघेणा प्रकाश केवळ समुद्रातच नव्हे तर ढगांमध्ये देखील प्रकाश-पुंजक्यांसारखा प्रकटतो आणि गायब होतो. मग तो कुणी गच्चीवर ठेवलेले धातूचे पाइप व सगळ्यांवर पाहिला. इतकेच काय तर झाडांच्या पानांची टोके आणि काचेचे तीष्ण तुकडेदेखील प्रकाश देताना नोंदी आढळल्या. टोकदार लायटनिंग कंडक्टर किंवा लायटनिंग रॉड अथवा आपल्याकडे आपण ज्याला लायटनिंग अरेस्टर म्हणतो. अगदी अशा कितीतरी गोष्टींची यादी जनसामान्यांनी आपले अनुभव नोंदवून शास्त्रज्ञांना कळविल्या. कुठे कुठे शास्त्रज्ञ वेडेपिर-फकिर बनत हिंडले आणि त्यांनी शोधले की टोकदार वस्तूंमधून वरच्या दिशेला जाणार्‍या शलाका यामधून अवतरणार्‍या संत एल्मो’ज फायर प्रकटण्यामागची असलेली जादू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आहे ती कधी स्टॅटिक कधी गतीमान वावरणारी विद्युतधारा!

- Advertisement -

अनेकदा आकाशात काही ढग किंवा ढगातील काही भाग अधिक प्रकाशित दिसतो. संत एल्मो’ज फायरची जादू म्हणजेच विद्युतप्रवाह आहे हे सिद्ध झाले. हवेच्या लहान भोवर्‍यात एक हजार व्होल्टप्रति सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेज निर्माण झाल्यास आग लागू शकते हे देखील दिसून आले. मग अशा आगीलाच शास्त्रीय परिभाषेत संत एल्मो’ज फायर म्हणून ओळखले जाऊ लागले.

अनेकदा अचानक विजांच्या वादळात धातूच्या टोकदार वस्तू, विद्युत तारा आग भडकविण्यास कारणीभूत ठरतात हेदेखील दिसले. परिणामी विद्युत प्रवाह खंडित असतानाही शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग अशा जगभरच्या खोट्या नोंदी हे विज्ञानाबाबतचे अज्ञान व त्यातून होणारे गैरसमज व गोंधळ आहे हे सुज्ञास वेगळे सांगणे नको. संत एल्मो’ज फायर आणि त्या मागचे विज्ञान म्हणजे भारी गंमतच आहे! विशेष म्हणजे संत एल्मो’ज फायर म्हणजे विशिष्ट विद्युतधारा होय. हे वाचून तुम्ही विस्मयचकित व्हाल. अचानक आगीचा भडका कसा उडतो याचा शोधप्रवास समजणे हीच मोठी रंजक बाब आहे.

- Advertisement -

संत एल्मो’ज फायर म्हणजे प्रकाशमान ‘इलेक्ट्रिक स्पार्क’ ची विद्युतधारेने निर्माण होणारी ज्योत होय. फ्लोरोसंट लॅम्प (ट्यूबलाइट प्रमाणे), मर्क्युरी व्हेपर लॅम्प यामध्ये निर्माण होणारा प्रकाशमान प्लाझ्मा असतो, पण हाच जेव्हा नैसर्गिकपणे वातावरणात प्रकटतो, तेव्हा त्याला म्हणायचे संत एल्मो’ज लाईट (प्रकाश)! आणि जेव्हा हा प्रकाशमान प्लाझ्मा एखादी गोष्ट पेटवून देतो तेव्हा अशा आगीला नाव मिळाले – संत एल्मो’ज फायर!

वातावरणात अनेकदा वातावरण विद्युत म्हणजे अ‍ॅटमॉस्फिअरीक इलेक्ट्रिसीटी इतकी प्रचंड वाढते की या विद्युतदाबाने हवेचे रेणू तुटतात आणि मग अणू वेगळे होतात. हेच मग अणूंचे आयन्स म्हणजे विद्युतभारित कणांमध्ये रूपांतरित होतात परिणामी इलेक्ट्रॉन विलग होण्याचा व एखाद्या झर्‍यासारखा विद्युतप्रवाह हवेत ओसंडून वाहू लागतो. परिणामी हा निसर्गाचा नयनरम्य आणि अनेकदा भीतीदायक स्वरूपात जीवघेणा असलेला खेळ आपल्यासमोर दृश्य स्वरुपात येतो तो आगीच्या रंग लाल-पिवळा असलेल्या ज्वालांच्या नृत्य रुपात. पृथ्वीचे वातावरण हे 78 टक्के नायट्रोजन व 21 टक्के ऑक्सिजनचे बनलेले आहे हे आपण जाणतोच. परिणामी याच वायूंच्या विघटन रुपात संत एल्मोज फायर दिसू लागते ती निळ्या-जांभळ्या किंवा पांढर्‍या रंगाची हलणारी भुताटकी, जिला पाहून कधीकाळी खलाशांची झोप उडाली होती तर काहींनी हीच आग पाहून बोबडी वळली म्हणून समुद्रात उड्या मारत आपला जीवदेखील दिला आहे.

गंमत म्हणजे कितीही पाणी ओता संत एल्मो’ज फायरची विद्युतज्योत विझत नाही. आणि तिची घातकता संपते तेव्हा तिने सर्वकाही स्वाहा केलेले असते. संत एल्मो’ज फायर आणि विजांमध्ये फरक आहे ही गोष्टदेखील लक्षात घ्यायला हवी. अनेक देशात शस्त्रसाठा आणि लढाई, फटाके इत्यादींमध्ये वापरला जाणारा दारूगोळा यांच्या स्फोटामागे शत्रूदेशाचा घातपात नसून अनेकदा संत एल्मो’ज फायर कारणीभूत ठरली आहे हे ‘एक्स फाईल’ किंवा ‘सिक्रेट फाईल’ मध्ये नोंदविले गेले आहे.

संत एल्मो’ज फायरमुळे सर्वत्र आगी लागतात का? हे एक कुतुहल सर्वांनाचे असते आणि त्यामागचे विज्ञान समजून घेण्यासाठी अतिशय सोपे आहे. संत एल्मो’ज फायर सर्वत्रच आगी लावत नाही हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी यामागे ही विज्ञान लपलेले आहे. आग लागण्यासाठी ‘फायर ट्रँगल’ची आवश्यकता असते ती तीन घटकांची-ज्वलनशील पदार्थ, पेटविण्यासाठी ठिणगी आणि ज्वलनास मदत करणारा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू! संत एल्मो’ज फायरने निर्माण झालेली ‘स्ट्राँग पॉइंट डिस्चार्ज स्पार्क’ (बाहेर पडणारी मजबूत विद्युत ठिणगी) आग पेटविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

संत एल्मो’ज फायरने भडकणार्‍या आगी रोखता येणे अगदी साध्या उपाययोजनांनी शक्य आहे. ‘फायर ट्रँगल’ तयार होण्याचे टाळून संत एल्मो’ज फायरमुळे वाढणार्‍या आगी टाळता येऊ शकतात. तसेच पेट्रोल, डिजल, गॅस अशा ज्वलनशील पदार्थांचा साठा टाळला तसेच अनावश्यक अणकुचीदार वस्तू निदान आपण ज्वलनशील पदार्थापासून दूर ठेवल्या तरी संत एल्मो’ज लाईटचे रुपांतर संत एल्मो’ज फायर मध्ये होणे नक्कीच आपण रोखू शकतो. विद्युत वायरिंगची सुयोग्य व व्यवस्थित ‘अर्थिंग’ याकामी घरोघरी आणि मोठमोठ्या कार्यालयातदेखील आगीने होणार्‍या नुकसानीपेक्षा किफायतशीर ठरते.

मार्च अखेर ते मे महिन्यापर्यंत भारतात विविध शहरांमध्ये घराघरात आणि माळरानावर नव्हे तर मोठमोठ्या जंगलातदेखील वनवे भडकत अचानक आगी लागण्याचे प्रमाण वाढलेले जाणवते. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आगीचे फोटो दिसू लागतात. आपल्याकडे मार्चअखेर अथवा एप्रिल-मे मध्येच नेहमीपेक्षा जास्त आगी लागतात आणि असे का होते यामागील विज्ञान समजेपर्यंत या आगी म्हणजे एक गुढ वाटणे देखील साहजिक आहे.

मार्च अखेर एप्रिल व मे महिन्यात अचानक हवेत एक हजार व्होल्ट प्रतिसेंटिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्टेज म्हणजेच विभवांतर निर्माण झाले, तर टोकदार वस्तूतून चर्-चर् आवाज करत आणि प्रकाश सोडत अत्यंत लहान अशा विद्युतभारित ठिणग्याच बाहेर पडू लागतात. त्याचा परिणाम आग लागण्यामध्ये होतो. वादळी अथवा ढगाळ वातावरणात संत एल्मो’ज फायर निर्माण होते. मात्र विजा चमकत नसतानाही व ढगाळ वातावरण नसतानादेखील संत एल्मो’ज फायर अनेकदा मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनोत्तर काळात तयार होऊ शकते. अशा वेळी जहाजांच्या शिडांवर, विमानांच्या आसपास, पायर्‍यांप्रमाणे हवेत पसरणार्‍या विजांच्या शलाका अनेकदा दिसून येतात.

यावर्षी देखील पुण्यात अनेक ठिकाणी आगीचा डोंब उसळत कोट्यावधी रुपयांची संपत्ती स्वाहा झाली आहे. विशेष म्हणजे अगदी वीजपुरवठा खंडित असतानाही लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे कशी असेल, असा प्रश्न पंचनामा व नोंदीच्या वेळी नेमका उद्भवतो. मात्र अनेक वेळा हा एका अजिबोगरीब फायर म्हणजे आगीचा परिणाम असू शकतो हे आश्चर्यकारक सत्य लोकांना माहीत नसते. अशावेळी अज्ञात कारणांनी किंवा शॉर्टसर्किटने लागलेली आग असा शेरा मारत ‘फायरची फाईल’ होते ‘क्लोज’ म्हणजे कायमची बंद! पण लागलेल्या आगींमागचे कारण हा संशोधनाचा विषय आहे आणि त्या मागे लपलेले कारण म्हणजे ‘संत एल्मो’ज फायर’ आहे. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एखादी आग पहाल तेव्हा नक्की विचार करा की त्यामागचे कारण आहे का – ‘संत एल्मो’ज फायर’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -