घरफिचर्ससारांशकिताबों में खो जाया करो

किताबों में खो जाया करो

Subscribe

अनेकांना 23 एप्रिलला ‘वर्ल्ड बूक डे’ का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्व काय हे माहीत नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊया. 23 एप्रिल याच तारखेची निवड का ? विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन 23 एप्रिल याच दिवशी झालं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली.

देव रुसला तर भीती वाटत नाही मला, पण पुस्तके रुसली तर खूप भीती वाटते. संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला गेला. त्यामुळे मागच्या आठवड्यापासूनच सोशल मीडियावर world book day हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट आहे. खरंतर अनेकांना 23 एप्रिलला ‘वर्ल्ड बूक डे’ का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्व काय हे माहीत नाही.

त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊया. 23 एप्रिल याच तारखेची निवड का ? विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन 23 एप्रिल याच दिवशी झालं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

किताबों में खो जाया करो,
पढ़ते वक़्त सो जाया करो,
कभी तो मिलेगी कामयाबी,
उसे तुम किस्मत से आजमाया करो…।

वाचनाशी माणसाची मैत्री असावी. मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपूल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. वि.स.खांडेकर, वि. वा. शिरवाडकरांपासून आजपर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत… रवींद्रनाथ टागोरांपासून गुलजारसाहेबांपर्यंत..

- Advertisement -

कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथांसारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत…
लिहणार्‍याने लिहीत जावे…
वाचणार्‍याने वाचत जावे
कधीतरी वाचणार्‍याने लिहणार्‍याचे शब्द घ्यावे
इतकं सुंदर आहे हे वाचणं.
वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात.
माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहे. असले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते.
वाचनामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय आपण अनेक नवीन शब्ददेखील शिकतो, जे आपले शब्दसंग्रह आणि आपले संवाद कौशल्य सुधारतात. जेव्हा आपण काहीही वाचतो तेव्हा आपण त्यात रमून जातो, आपण आपला भूतकाळ विसरतो आणि वर्तमानात जगतो. पुस्तके वाचून आपण आपल्या वाईट आठवणी विसरतो, त्यामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते. पुस्तके ही जगातील सर्वात शक्तिशाली वस्तूंपैकी एक आहे. ते आम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि प्रेरित राहण्यासाठी नवीन संधी देतात…
वाचण्यासाठी चांगली पुस्तके कशी शोधावी..?
सर्वप्रथम, तुम्हाला वाचायला काय आवडतं? हे शोधून काढायला हवं. समजा तुम्हाला जर भयकथा वाचायला आवडत असतील, तर तुम्हाला नारायण धारपांची पुस्तके आवडतील, पण मग व.पु. काळे यांनी लिहिलेली पुस्तकं वाचताना, तुम्हाला कंटाळा येईल.
पुस्तक चांगलं आहे ना, मग वाचायलाच पाहिजे, असा अट्टाहास करू नका, एखाद्या विनोदी स्वभावाच्या माणसाला, गंभीर विषयाचं पुस्तकं कंटाळवाणं वाटेल, त्यात ना त्या पुस्तकाचा दोष आहे ना त्यात माणसाचा.
म्हणून तुमच्या आवडीला प्राधान्य देऊन तुम्ही पुस्तकं शोधा, जर तुम्हाला प्रेमकथा वाचायला आवडत असतील, तर मग प्रेमकथा असलेली चांगली पुस्तकं शोधा.

चांगली पुस्तकं शोधायची कशी ? कोणीतरी सांगतं की अमुक अमुक पुस्तकं चांगलं आहे, नक्की वाचं. मग सरळ त्या पुस्तकाचं नाव गुगल करायचे, असे केल्याने त्या पुस्तकाची अमेझॉन डॉट कॉमची लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन, पुस्तकाची माहिती वाचून घ्यावी, पुस्तकं कशावर आहे ? विषय काय आहे ? हे सगळं तपासून बघावं मग, त्या पुस्तकाखाली लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचाव्यात. या प्रतिक्रिया बर्‍याच वेळा सारख्याच असतात, जर पुस्तकं कंटाळवाणं असेल तर तसं लोकं स्पष्ट लिहितात. या प्रतिक्रिया वाचून पुस्तकाबद्दल अंदाज येतो. आता, जर तुम्ही मोबाईलवर किंडल ईबुक रीडर अ‍ॅप वापरत असाल, त्या पुस्तकाची ईबुक आवृत्ती उपलब्ध असेल, तर ईबुक आवृत्तीचे पहिले काही चॅपटर्स ऍमेझॉन डॉट कॉम वरून मोफत डाउनलोड करता येतात. मग हे मोफत चॅपटर्स वाचून तुम्हाला जर पुस्तकं पुढे वाचावंस वाटलं, तर लगेच ते पुस्तकं विकत घेऊन वाचायला सुरवात करावी…

किताबों के साथ ज़िन्दगी बिताया करो यारो,
ज़िन्दगी में कुछ अच्छा सीखने के लिए..

—गोपाल भडांगे

 

 

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -