घरफिचर्ससारांशट्विटरवर इलॉन मस्कचे राज्य

ट्विटरवर इलॉन मस्कचे राज्य

Subscribe

इलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले. या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३६८ अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी इलॉन मस्कसोबत झालेल्या कराराच्या दरम्यान, ट्विटरने सांगितले की अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती खासगी मालकीची कंपनी बनेल. दरम्यान, टेस्ला चीफचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर दोन्ही कंपन्यांमध्ये डील झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक इलॉन मस्क ट्विटरवर राज्य करणार आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी विकत घेतले आहे. इलॉन रीव्ह मस्क (२८ जून १९७१, गॉटेंग, दक्षिण आफ्रिका ) हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. हे टेसला मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी ह्या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतात.

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क अग्रस्थानी आहेत. त्यांची एकूण मालमत्ता २६९.७ अब्ज डॉलर असून, ती काही देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. इतकी मोठी संपत्ती एकवटलेल्या या व्यक्तीकडे आता अतिशय प्रभावशाली असे समाज माध्यम येत आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ‘ट्विटर’मधील नऊ टक्के समभाग विकत घेतले होते. एक समाज माध्यम आपण स्वत:च उभारणार असल्याची भाषा मस्क यांनी यापूर्वी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ट्विटर’मधील समभाग विकत घेतल्याने ते या कंपनीवर ताबा मिळविणार अशी चिन्हे होतीच. ‘ट्विटर’ खरेदीबाबत काही बाबी समोर आल्या आहेत, तर काही अजून स्पष्ट झाल्या नाहीत. आर्थिक व्यवहाराचा तपशील हळुहळू बाहेर येईल.

- Advertisement -

ट्विटरच्या खरेदीत अर्थ कळीचा असला, तर त्यात वेगवेगळे अर्थही दडले आहेत. एक मोठे समाज माध्यम विकले जाताना त्याकडे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. ट्विटरची खरेदी हा केवळ आर्थिक व्यवहाराचा मुद्दा नाही; अभिव्यक्तीचा आणि विचारसरणीचा मुद्दाही त्यात आहे. मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यामागे आर्थिक लाभ-हानीचा विचार नक्कीच केला असणार; परंतु त्याखेरीज यामागे विचारसरणीच्या नियंत्रणाचाही हेतू असू शकतो काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

इलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले. या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३३६८ अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी इलॉन मस्कसोबत झालेल्या कराराच्या दरम्यान, ट्विटरने सांगितले की अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती खासगी मालकीची कंपनी बनेल. दरम्यान, टेस्ला चीफचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटनंतर दोन्ही कंपन्यांमध्ये डील झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक इलॉन मस्क ट्विटरवर राज्य करणार आहे.

- Advertisement -

‘इलॉन मस्क यांनी ट्विट केले, मला आशा आहे की माझे सर्वात वाईट टीकाकार देखील ट्विटरवर असतील. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे.’ मस्कचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी अशी बातमी होती की ट्विटर प्रति शेअर ५४.२० च्या रोख किंमतीवर मस्कच्या हातात जाऊ शकते. वृत्तानुसार, ट्विटर हा करार पूर्ण करण्याच्या जवळ आहे. हीच किंमत इलॉन मस्कने ट्विटरवर देऊ केली होती.

मस्ककडे ट्विटरचे ९.२ टक्के शेअर्स आहेत. टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांची सध्या ट्विटरमध्ये ९.२ टक्के भागीदारी आहे. इलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी ट्विटरमधील ही हिस्सेदारी खरेदी केली होती. यासह मस्क ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले. तथापि, नंतर व्हॅनगार्ड ग्रुपच्या फंडाने ट्विटरमध्ये १०.३ टक्के हिस्सा विकत घेतला. अशा प्रकारे ती कंपनीची सर्वात मोठी शेअरहोल्डर बनली.

‘लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. डिजिटल क्षेत्रात ट्विटर यासाठी व्यासपीठ देते. तिथेही मुक्त अभिव्यक्तीची संधी मिळायला हवी,’ हे मस्क यांचे विधान त्यांचा हेतू स्पष्ट करणारे आहे. ट्विटरवर कोणालाही आपले मत मुक्तपणे मांडता यावे, त्यांच्यावर निर्बंध घातले जाऊ नयेत, असे मस्क यांना सुचवायचे आहे. ट्विटरवर जी मते मांडली जातात, ती वापरणार्‍यांना विशिष्ट क्रमाने दिसतात. वापरणारे ज्यांना फॉलो करतात, ज्यांना भरपूर पाठीराखे आहेत, जे सतत मत मांडतात अशा अनेक निकषांच्या आधारे हा क्रम व्यक्तीनिहाय दिसतो. त्यासाठी कार्यप्रणाली (अल्गोरिदम) असते. ही कार्यप्रणाली खुली करण्याचा विचारही मस्क यांनी मांडला आहे. या पारदर्शकतेमुळे ट्विटरच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल; यामुळे ट्विटरची परिणामकारकताही वाढेल. मस्क यांच्या मालकीहक्काखाली ट्विटरचे धोरण कसे असू शकेल, याची कल्पना यातून येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मस्क उच्चरवाने पुरस्कार करीत असल्याने ट्विटर अधिक खुली आणि पारदर्शक होईल असे वाटत असले, तरी याकडे सावधतेने पाहिले जात आहे. अनेकांना याबाबत शंकाही आहेत.

सुमारे चाळीस कोटींहून अधिक लोक ट्विटरचा वापर करीत असून, या माध्यमाद्वारे दररोज व्यक्त होणार्‍यांची संख्या सोळा कोटींहून अधिक आहे. समाजावर प्रभाव पाडू शकणार्‍या या माध्यमाचे नियंत्रण एकाच व्यक्तीकडे येणार असल्याने या शंका रास्त म्हणाव्या लागतील. समाज माध्यमांद्वारे प्रचार मोहिमा राबवून जनमानसाला मोहीत करण्याचा प्रकार अनेक देशांत होतो आहे. खर्‍या-खोट्या माहितीचे मिश्रण करून अपप्रचार आणि अफवाही पसरविल्या जातात. डावे, उजवे, धार्मिक मूलतत्त्ववादी, उदारमतवादी अशा विविध विचारसरणींचे लोक समाज माध्यमांचा उपयोग समाजमन घडविण्यासाठी करीत असतात. समाज माध्यमांच्या साह्याने सरकारे उलथवून टाकण्याचे किंवा विशिष्ट विचारांचे सरकार सत्तेवर आणण्याचे प्रकारही घडत आहेत.

अशा स्थितीत समाज माध्यमांच्या नियंत्रकांना अतिशय सावध राहणे, त्या-त्या देशांतील नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. समाजात तेढ किंवा दुफळी निर्माण करणारा किंवा द्वेषभावना वाढीस लावणारा आशय जर कोणी मुक्त अभिव्यक्तीच्या नावाखाली समाज माध्यमावर टाकत असेल, तर त्यांना रोखायलाच हवे. याबाबतचा आग्रह वाढल्यानंतर ट्विटरने काहींना रोखले आहे. काहींचे ट्विट हटविले आहे. मस्क यांची मुक्त अभिव्यक्तीची भाषा योग्य आहे; परंतु द्वेषमूलक आणि चुकीची माहिती देणार्‍यांना रोखण्याबद्दल ते अद्याप बोललेले नाहीत. डाव्या आणि उजव्या या टोकाच्या विचारसरणीचे प्रत्येकी दहा टक्के लोक नाराज असले, तर समाज माध्यमाचे धोरण चांगले म्हणता येईल, असे मत त्यांनी जरूर नोंदविले आहे. माझा कडवा विरोधकही ट्विटरवर राहायला हवा; कारण यातूनच मुक्त अभिव्यक्ती दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे मुद्दे त्यांनी अधिक उलगडून सांगितले, तर त्यांच्या काळातील ट्विटर धोरणाचा अंदाज येऊ शकेल.

इलॉन मस्क यांची तीन महत्वाची धोरणे आहेत –
पहिले म्हणजे फ्री स्पीच प्लॅटफॉर्म, ट्विटरपेक्षा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे जास्त पैसे कमावतात, यूट्यूबचा मागील वर्षाचा नफा हा २८ बिलियन डॉलर, अ‍ॅमेझॉनचा ३० बिलियन डॉलर तर फेसबुकचा चक्क ११७ मिलियन डॉलर इतका आहे, त्याचप्रमाणे ट्विटर वरती मोठ्या प्रमाणात राजकीय, उद्योगपती, फिल्मस्टार्स या क्षेत्रामधील दिग्गज लोकांचे अकाउंट आहेत. ही बाब लक्षात घेऊन इलॉन मस्क यांचा फ्रीडम ऑफ स्पीच या धोरणावर जास्तीत जास्त भर आहे. दुसरे असे की, जे खोटे व बनावट अकाउंट बनवून त्याहून इतरांना ट्रोल केले जाते तसे अकाउंट ट्विटरवरून कायमस्वरूपी काढून टाकायचे.

तिसरे धोरण म्हणजे-इलॉन मस्क यांचा एका ट्विटने डॉजकॉइन या क्रीप्टोकरन्सीची किंमत खाली वर होऊ शकते. त्याचप्रमाणे टेस्ला बिटकॉइन सोबत खरेदी केली जाऊ शकते या घोषणेने बिटकॉइन ऑल टाइम हाय ठेवणे हेदेखील ट्विटद्वारे केले जाऊ शकते.

मस्क यांना कोणताही ट्विट करण्याआधी SEC ची परवानगी घ्यावी लागते SEC म्हणजे सेक्रेटरी अँड एक्सचेंज कमिशन. कारण लोक मस्क यांच्यापासून प्रेरित होऊन स्टॉक मार्केटमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकतात, ज्याने मार्केटमध्ये खूप उथल-पुथल होऊ शकते. ही पॉवर मस्क आपल्या हातून सोडू इच्छित नाहीत, अद्याप तरी ट्विटर ही कंपनी पब्लिक होती, आता ती प्रायव्हेट होऊन जाईल. ट्विटरचे शेअर मार्केटमधील लिस्टेड शेअर्स डीलीस्टेड होऊन जातील आणि त्यामुळे कंट्रोल पूर्ण मस्क यांच्या हातात येईल. येत्या काही दिवसात ट्विटर एक इंटरेस्टिंग प्लॅटफॉर्म होणार हे नक्की.

– -राकेश मुंडावरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -