घरफिचर्सअसामान्य बुद्धिमत्तेचे विवेकानंद

असामान्य बुद्धिमत्तेचे विवेकानंद

Subscribe

12 जानेवारी 1863 कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहर्‍यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणार्‍यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी. विश्वनाथ दत्त हे कोलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी धंद्यात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी ही भुवनेश्वरी समाधानी व धार्मिक होती. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता. तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जगप्रसिद्ध झाले.

पहिल्याच वर्गात त्यांनी अमरकोश पाठ केला. यावरून त्यांची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते. एका मुसलमान गवयाकडे गायन शिकले.आखाड्यात जाउन कुस्त्या खेळू लागले. चांगले गोटीबंद शरीर कमाविले. त्यामुळे वर्गातील मुले त्यांना भीत असत. ते सर्वांचे पुढारी होते. त्यांच्या नुसत्या शब्दाने त्यांची भांडणे मिटत. 1877 साली ते वडिलांसोबत रायपूरला गेले. त्यावेळी बैलगाडीतून प्रवास करावा लागला. तिथे त्यावेळी शाळा तर नव्हतीच त्यावेळी त्याना तेथे रानावनातून फिरण्याचा व सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रसंग आला. त्याचाच त्यांनी अभ्यास केला. 1879 मध्ये परत कोलकत्त्याला आले. परत शाळा सुरू झाली त्यावेळी त्यांनी वाचनालयात जावून मोठमोठे ग्रंथ वाचले. त्यावरून अनेक विषय आत्मसात केले.

- Advertisement -

कॉलेजचे प्राचार्य हेस्टी यांनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पाठविले. संत परमहंस यांनी आपल्या तिक्ष्ण दृष्टीने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. ते आपल्या भक्तांना म्हणाले. हा नरेंद्र मानव जातीच्या उद्धारासाठीच जन्मलेला आहे, तो हिंदुधर्म आणि हिंदुस्थानची मान सार्‍या जगात उंचावेल. सन 1881 साली डफ कॉलेजातून उत्तम गुणांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. नरेंद्र व रामकृष्ण यांच्या ईतर शिष्यांनी बडानगर येथे त्यांचा मठ स्थापन केला, 1888 साली नरेंद्र 25 वर्षाचे झाले. सर्व भारत फिरून बघावा अशी त्यांची ईच्छा झाली. आणि तेव्हाच प्रवासास निघाले. काशी, अयोध्या, गया, आग्रा, वृंदावन असे करीत करीत ते पायीच फिरले. नरेंद्रला लोक पुढे स्वामी विवेकानंद म्हणू लागले. त्यांनी 1890 साली रामकृष्णांच्या पत्नी शारदादेवी यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले. 31 मे 1893 रोजी स्वामी अमेरिकेला निघाले.

त्यांनी रामकृष्णांच्या फोटोला वंदन करून कालीमातेचे स्मरण केले. भगव्या रंगाचा पोशाख चढविला. भगवा फेटा गुंडाळला. भगवद्गीता घेऊन त्यांनी बोटीवर प्रवास सुरु केला. चीन, जपान, नंतर ते शिकागो बंदरात उतरले. 11 सप्टेंबर रोजी सर्वधर्म परिषद सुरु झाली. त्यांनी भाषणाला सुरवात केली. माझ्या अमेरिकन बंधू-भगिनींनो ! या त्यांच्या पहिल्याच वाक्याला सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला, तो तब्बल दोन ते तीन मिनिटे चालला. त्यांनी हिंदूधर्मावरील परिपूर्ण भाषण दिले. अमेरिकेतही त्यांचा शिष्यवर्ग निर्माण झाला. 1902 साली विवेकानंदांची प्रकृती जास्त बिघडली. ४ जुलै 1902 साली त्यांनी वयाच्या 39 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -